विजय मांडे कर्जत : गणपती उत्सव काळात छातीत दुखू लागल्याने ४५ वर्षीय ताराबाई पवार यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने तातडीने मुंबईमधील जे. जे. रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापूर्वी एमजीएम रु ग्णालयात दाखल असताना ताराबाई पवार यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. ५ सप्टेंबर रोजी निधन झाल्यानंतर त्यांचे डोळे, हृदय आणि लिव्हर यांचे तीन वेगवेगळ्या रुग्णांवर तसेच डोळ्यांचे अन्य एका रुग्णावर रोपण करण्यात आले. सर जे.जे. रुग्णालयात दुसरे कॅडेव्हरीक अवयवदान आणि पहिले यशस्वी कॅडेव्हरीक किडनी रोपण करण्यात आले. ताराबाई पवार यांच्या अवयवदानाने चार व्यक्तींना जीवनदान दिल्याने राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या कुटुंबाचा विशेष गौरव करण्यात आला.जे.जे. रुग्णालयात ५ सप्टेंबर रोजी ब्रेन डेड रुग्ण ताराबाई श्रावण पवार अवयवदान प्रक्रि या पूर्ण करण्यात आली. त्यानंतर अवयवदात्या ताराबाई पवार यांचे हृदय याचे फोर्टीस रुग्णालयातील रु ग्णास रोपण करण्यात आले. लिव्हर हे नवी मुंबईतील अपोलो रु ग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णाच्या शरीरात रोपण करण्यात आले. तर ताराबाई पवार यांची एक किडनी ज्युपिटर रु ग्णालयातील एका रूग्णास आणि दुसरी किडनी तसेच दोन डोळे यांचे रोपण मुंबईतील सर जे.जे. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णास करण्यात आले. त्यांनी चार रूग्णांना जीवनदान व दोन रूग्णांना दृष्टीदान देऊन सामाजिक काम करण्याचा वसा मृत्यूनंतरही कायम ठेवला. कर्जत तालुक्यातील कशेळे येथील श्रावण पवारसारख्या अशिक्षित आणि भटक्या स्वरूपात उदरनिर्वाह करणाºया सामान्य माणसाने आपल्या पत्नीचे अवयवदान करून समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे.४ सप्टेंबर रोजी मृत झालेल्या ताराबाई श्रावण पवार यांचे अवयवदान करण्यासाठी जे.जे. रु ग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या नेतृत्वाखाली, रु ग्णालय अधीक्षक डॉ. संजय सुरासे तसेच त्यांचे सहकारी,डॉ. अजय भंडारवार आणि त्यांची टीम, डॉ. भरत शहा आणि सहकाºयांनी करून घेतले. तर किडनीरोपण डॉ. व्यंकट गीते, डॉ. गीता सेठ, समाजसेवा अधीक्षक राठोड, सावरकर, पाटील, डॉ. नंदकर, डॉ. विद्या नागर, डॉ. मधुकर गायकवाड, डॉ. विकास मैंदाड तसेच सर्व कर्मचाºयांनी करून घेतले. रामेश्वर नाईक यांनी जे.जे. रु ग्णालयातील दुसरे अवयवदान यशस्वी केले.
कर्जतमधील महिलेचे अवयवदान, पाच रुग्णांना जीवनदान : राज्य सरकारच्या वतीने ताराबाई पवार यांच्या कुटुंबाचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 3:17 AM