कर्जत : शिक्षण महत्त्वाचे आहे असे सांगून कोळशातून जसा हिरा ताऊन सुलाखून बाहेर येतो तसे हिऱ्यासारखे तुम्ही या महाविद्यालयातून बाहेर पडले पाहिजे. जहाज खोल पाण्यात असते तसे तुम्ही खोलवर लांब जाऊन ज्ञान प्राप्त करायला हवे तरच या युगात आपला टिकाव लागेल, असे प्रतिपादन रिलायन्स पॉलीस्टर इंडस्ट्रीज पाताळगंगा रसायनीचे अध्यक्ष हेमंत बाळ यांनी केले.कोकण ज्ञानपीठ कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय आणि कर्जत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा संपन्न झाला. मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून महाविद्यालयांमध्ये पदवीदान सोहळा करण्याचे निर्देश दिल्याने या सोहळ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण ज्ञानपीठाच्या सेमिनार हॉलमध्ये पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रिलायन्स पॉलीस्टर इंडस्ट्रीज पाताळगंगा रसायनीचे अध्यक्ष हेमंत बाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्र माचा शुभारंभ करण्यात आला. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष कॅप्टन सारीपुता वांगडी, खजिनदार झुलकरनैन डाभिया, सचिव प्रदीप शृंगारपुरे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन केतन पाटील व केतकी पाटील यांनी केले तर आभार विजयानंद चित्रगार यांनी मानले. (वार्ताहर)
खोलात जाऊन ज्ञान मिळवा
By admin | Published: January 20, 2016 2:00 AM