शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
5
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
6
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
7
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
8
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
9
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
10
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
11
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
12
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
13
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
14
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
16
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
17
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
18
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
19
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
20
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'

विद्यार्थीदशेतच ध्येय निश्चिती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 3:18 AM

सोमनाथ जाधव : रायझिंग डेनिमित्त नेरळ पोलिसांकडून विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती

नेरळ : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. जर ध्येय निश्चित असेल तर तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट घेण्याची उमेद निर्माण होते, असे प्रतिपादन नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी केले आहे. २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासात पोलीस स्थापना दिवस रायझिंग डे म्हणून साजरा करण्यात येतो, या रायझिंग दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्र म राबविले जात आहेत. असाच रायझिंग डे सध्या नेरळ पोलीस ठाण्याच्या वतीने साजरा केला, त्याप्रसंगी जाधव बोलत होते.

रायझिंग डेनिमित्त नेरळ पोलिसांच्या वतीने परिसरातील शाळांमध्ये जाऊन पोलिसांच्या वतीने मार्गदर्शन केले जात आहे. सोमवारी नेरळ विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शस्त्राविषयी माहिती व कायदेविषयी माहिती देण्यात आली आहे. कायदा म्हणजे काय? गुन्हे, तक्र ारी, कायदेविषयक पुस्तके आदी विषयांची माहिती देऊन शस्त्रविषयी माहिती, स्त्रियांविषयी कायदे या विषयी माहिती देण्यात आली. तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी, विद्यार्थ्यांना आईवडील काही बोलण्यास टोकाची भूमिका घेऊ नये, ते आपल्या चांगल्यासाठी बोलत असतात, असे सांगून चुकीचे काही बोलत असतील तर पोलीस स्टेशनला येऊन सांगावे. पोलीस स्टेशनमध्ये येणारे अपराधीच नसतात. पोलीस हे मित्रच असतात. तसेच अल्पवयीन विद्यार्थ्यांनी दुचाकी चालवू नये, त्यामुळे पालकांवर गुन्हा दाखल होतो. कोण चुकीचे बोलत असेल तर तक्र ार बॉक्समध्ये तक्र ार करावी, अन्यथा पोलिसांना फोन करून सांगावे त्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले.

मोबाइल तसेच व्हाट्सअ‍ॅपचा वापर टाळावा, सोशल मीडियावरील भूलथापांना विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. चांगले शिक्षण घेऊन पुढील ध्येय निश्चित करावे, असा सल्ला पोलीस कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आला. या वेळी नेरळ पोलिसांनी पोशीर येथील श्रमजीवी जनता विद्यामंदिर, हाजी लियाकत इंग्लिश स्कूल, नेरळ विद्यामंदिर नेरळ, विद्याविकासमंदिर नेरळ आदी शाळांमध्ये रायझिंग डे साजरा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पोलीस उपनिरीक्षक रतिलाल तडवी, सहायक फौजदार बी. एस. जाधव, पोलीस शिपाई नागरगोजे, शिक्षक निवृत्ती पल्ले, अभिजित वसावे आदी शिक्षक, विद्यार्थी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.पोलीस स्थापना दिवस सप्ताहाचा समारोपच्कर्जत : पोलीस दल स्थापना दिवस कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत साजरा करण्यात आला. २ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये पोलीस स्थापना दिवस सप्ताह साजरा करण्यात आला. या वेळी विविध सामाजिक संस्था व शाळांमधून समाज प्रबोधनपर कार्यक्र म सादर करण्यात आले. मंगळवारी या सप्ताहाचा समारोप करण्यात आला.च्लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकामध्ये २ जानेवारी रोजी सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला होता. मंगळवार, ८ जानेवारीला या सप्ताहाच्या समारोप प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक जोगदंड, यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि वैशाली भोसले, नंदा भोसले आदीसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.च्उद्घाटन प्रसंगी रायगड पोलीस बँड पथकाच्या देश भक्तिपर गाण्याने सप्ताहास सुरुवात झाली, तर समारोपप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रीझम सामाजिक विकास संस्था अलिबागच्या वतीने ‘आॅन ड्युटी चोवीस तास’ हे पथनाट्य श्रेया म्हात्रे, मनस्वी सहस्रबुद्धे, सपना पटवा, अभिषेक नाईक, अनिकेत फलटणकर, प्रेम पाटील, विनोद नाईक, विराज म्हात्रे यांनी पथनाट्य सादर केले. ‘खाकी वर्दीच्या मागे असतो माणुसकीचा झरा, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या जरा’ यामधून पोलीस कर्मचाºयांच्या जीवनाचे दर्शन घडवले.पथनाट्यातून पोलिसांच्या कामाची माहितीच्रसायनी : मोहोपाडा येथील जनता विद्यालयात मंंगळवारी पोलीस स्थापना दिनानिमित्ताने रसायनी पोलिसांच्या वतीने ‘आॅन ड्युटी चोवीस तास’ हे पथनाट्य प्रीझम सामाजिक संस्थेच्या कलाकारांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केले. पोलिसांना बंदोबस्त, तपासकार्य, नागरिकांची सुरक्षा, मोर्चे, दंगल, अपघात मदतकार्य, निवडणुका अशी अनेक कामे करावी लागतात. पोलिसांना कधी- कधी जीवावरच्या जोखमीची कामे करावी लागतात. एक नागरिक म्हणून पोलिसांना योग्य कामी मदत केली पाहिजे, असा संदेश ‘आॅन ड्युटी चोवीस तास’ या पथनाट्यातून देण्यात आला. कार्यक्र मावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे प्रमुख निरीक्षक अशोक जगदाळे, सहायक फौजदार बी. एल. पवार, पो. कॉ. पी. बी. भंडलकर आणि शिक्षक उपस्थित होते.रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पथनाट्यच्नागोठणे : पोलीस दलाच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी येथील शिवाजी चौकात मंगळवारी पथनाट्य सादर केले. रासेयोचे कार्यक्र म अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या या अभियानात निवेदिता म्हात्रे, रु चिका निकम, संगीता गुरव, तृप्ती बावदाने, निकिता भिलारे, स्नेहा म्हशेलकर, रूपाली कासार, सायली लोखंडे, अक्षय खांडेकर आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Raigadरायगड