सुखद बातमी! रानसई धरण अखेर ओव्हर फ्लो; उरणकरांची चिंता मिटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 08:59 AM2023-07-18T08:59:41+5:302023-07-18T09:00:37+5:30

उरण तालुक्यातील २५ गावे,उरण शहर  आणि काही औद्योगिक विभागासह सुमारे दोन लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो.

Good news! Ransai Dam finally overflows; The water worries of the people of Uran are solved | सुखद बातमी! रानसई धरण अखेर ओव्हर फ्लो; उरणकरांची चिंता मिटली 

सुखद बातमी! रानसई धरण अखेर ओव्हर फ्लो; उरणकरांची चिंता मिटली 

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यातील दोन लाख नागरिकांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण मंगळवारी (१८) पहाटेच्या सुमारास ओव्हर फ्लो होऊन वाहु लागले आहे.मागील काही दिवसांपासून कोसळणारे आणि डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहु लागले आहे. मागील वर्षीही १८ जुलै रोजीच धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती उरण एमआयडीसीच्या कार्यालयातुन देण्यात आली.

उरण तालुक्यातील २५ गावे,उरण शहर  आणि काही औद्योगिक विभागासह सुमारे दोन लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. जून महिना जवळपास पुरता कोरडाच गेला होता.पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासुनच धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळी सातत्याने वाढत  चालली होती. त्यातच डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे मंगळवारी (१८)   पहाटे ४ वाजल्यापासून धरण दुथडी भरून वाहत आहे.त्यामुळे उरणकरांची पाणी टंचाईचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Good news! Ransai Dam finally overflows; The water worries of the people of Uran are solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस