विनावाहक विनाथांबा योजनेला चांगला प्रतिसाद, पेणसह अलिबागपर्यंत रोज ३६ फे-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 04:01 AM2017-12-24T04:01:35+5:302017-12-24T04:01:37+5:30
एसटीने पनवेल स्थानकातून अलिबाग व पेणसाठी विनाथांबा व विनावाहक वाहतूकसेवा सुरू केल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे खासगी वाहनाने जाणारा प्रवासी पुन्हा एस.टी.कडे परत आला. या फेºयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पनवेल : एसटीने पनवेल स्थानकातून अलिबाग व पेणसाठी विनाथांबा व विनावाहक वाहतूकसेवा सुरू केल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे खासगी वाहनाने जाणारा प्रवासी पुन्हा एस.टी.कडे परत आला. या फेºयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एस.टी. महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी विनाथांबा व विनावाहक सेवा पनवेल स्थानकातून अलिबाग व पेणसाठी सुरू केली. या सेवेमुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. आलिबाग गाडी आली की तिच्या मागे धावावे लागायचे, यामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांचे हाल व्हायचे. रांगेत उभे राहून तिकीट घेऊन गाडीत गेले की, बसायला आरामात जागा मिळते. त्यामुळे पाकीटमारांपासून बचाव झाला. गाडी विनाथांबा असल्याने लवकर पोहोचते. त्यामुळे अनेक खासगीकडे गेलेले प्रवासी पुन्हा एस.टी.कडे परत आले आहेत.
या गाड्यांचे बुकिंग करणारे वाहक दीपक कांबळे व त्यांचे सहकारी सांगतात की, या गाडीसाठी अनेक प्रवासी वाट पाहत असतात. दिवसात अलिबाग व पेणासाठी ३६ फेºया या विनाथांबा व विनावाहक सोडल्या जातात. यामुळे एस.टी.ला चांगले उत्पन्नही मिळत असल्याचे त्यांनी संगितले.
अलिबागसाठी पनवेलहून विनाथांबा व विनावाहक गाडी सुरू केल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. गाडी आल्यावर जागा पकडण्यासाठी धावावे लागत नाही. दरवाजात गर्दी झाली की, त्याचा फायदा पाकीटमार घेत होते. महिलांचे दागिने खेचून नेत होते. यापासून आमची सुटका झाली. रांगेत उभे राहिले की जागा मिळण्याची खात्री असते.
- विजया कदम, महिला प्रवासी.