ढोल-ताशांच्या गजरात देवीला निरोप

By admin | Published: October 23, 2015 12:19 AM2015-10-23T00:19:27+5:302015-10-23T00:19:27+5:30

रायगड जिल्ह्यात गुरु वारी विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवरात्रौत्सवाची सांगता करताना एक हजार ११० सार्वजनिक

Goodbye to the Goddess of the drums | ढोल-ताशांच्या गजरात देवीला निरोप

ढोल-ताशांच्या गजरात देवीला निरोप

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरु वारी विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवरात्रौत्सवाची सांगता करताना एक हजार ११० सार्वजनिक आणि १६९ खाजगी देवीच्या मूर्तींचे ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या दणदणाटात विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
१३ आॅक्टोबरला घटस्थापना करण्यात आली होती. नवरात्रीच्या नऊ दिवस विविध मंडळांनी दांडिया, गरबा खेळत देवीचे जागरण केले. नऊ दिवस चाललेल्या या जल्लोषात तरुण-तरुणी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे आबालवृध्दांनीही सणाचा आनंद लुटला. देवीच्या येण्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. समुद्र किनारी, तळे, नद्या अशा पाणवठ्याच्या ठिकाणी देवींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

श्री धावीर महाराज घाटावरु न उठले
रोहा : रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांना दसऱ्याच्या दिवशी दहाव्या माळेला देवघटावरुन मोठ्या भक्तिभावनेने उठविण्यात आले. उद्या शुक्रवारी महाराजांच्या पालखी उत्सवास प्रारंभ होणार आहे. नवरात्रीत देवघटी बसलेले घरचे देव, कुळदेव, गावदेव आदी देवांना नवव्या माळेला उठविण्याची परंपरा आहे.

Web Title: Goodbye to the Goddess of the drums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.