अलिबाग : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स लॉजिंग, कॉटेजेस हाउसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यात विशेषत: अलिबागमध्ये येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अलिबाग समुद्रकिनारी तसेच शहर परिसरामध्ये ड्रोन कॅमेºयाची नजर राहणार आहे.३१ डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यात येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलीस दलातर्फे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडील कर्मचाºयांशिवाय सुमारे ३०० पोलीस कर्मचारी अतिरिक्त नेमण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग, अलिबाग मार्गावर वाहतुकीसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी चेकपोस्टवर बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वेळोवेळी वाहनांची तपासणी, नाकाबंदी करण्यात येणार आहे. पर्यटक मोठ्या संख्येने ज्या ठिकाणी जातात. त्यातील अलिबाग, नागाव, मुरु ड, दिघी समुद्रकिनाºयासह बीचवर बिट मार्शल आणि दामिनी पथकाची विशेष पेट्रोलिंग टिम नेमण्यात आली आहे. याशिवाय विविध संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट, तसेच नियंत्रण कक्ष पी.सी.आर. मोबाइलही सज्ज ठेवण्यात आले आहेत.सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन बोटी समुद्रामध्ये पेट्रोलिंगसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सागरी गस्तीबाबतही संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबर रोजी दारू पिऊन वाहन चालवणाºया तळीरामांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. ठिकठिकाणी ब्रेथ अॅनालायझर मशिनचा वापर करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाºयांवर कायद्याचा बडगा उगारण्यात येणार आहे. पर्यटकांनी ३१ डिसेंबर रोजी आपल्यामुळे दुसºयाला त्रास होणार नाही, याची खबरदारी घेऊन सुरक्षितपणे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करावे, असे आवाहन रायगड पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील विविध हॉटेल्सही सज्ज झाली आहेत. काही ठिकाणी डीजे नाइट पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. रेस्टॉरंट बारमालकांना त्यांची नेहमीची जागा कमी पडणार असल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून तात्पुरते परवाने काढले आहेत.>महाविद्यालयीन विद्यार्थीकरणार पोलिसांना मदतअलिबाग, वरसोली, नागाव, किहीम बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अशा गर्दीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी साध्या वेशामध्ये धिंगाणा घालणाºयांवर नजर ठेवणार आहेत. अनुचित प्रकार घडताना आढळल्यास ते तातडीने पोलिसांना कळवणार आहेत.
#GoodBye2017: धिंगाणा घालणा-यांवर राहणार ड्रोनची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 2:41 AM