गोरेगावमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत दोन दुकाने खाक
By admin | Published: March 10, 2017 12:56 AM2017-03-10T00:56:49+5:302017-03-10T00:56:49+5:30
गोरेगावमध्ये बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत जुन्या बाजारपेठेत फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्सची दोन दुकाने भस्मसात झाली.
माणगाव : गोरेगावमध्ये बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत जुन्या बाजारपेठेत फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्सची दोन दुकाने भस्मसात झाली.
गोरेगावमधील जुन्या बाजारपेठेत बुधवार, ८ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दोन घरांसह तळमजल्यावरील फर्निचरची दोन दुकाने जळून भस्मसात झाली; तसेच एक ा किराणा दुकानाचे नुकसान झाले असून, फर्निचरच्या दुकानांची अंदाजे २५ लाखांची वित्तहानी झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग शॉर्टसर्किट झाल्याने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. आग एवढी प्रचंड होती की, दोन्ही फर्निचर दुकाने खाक झाली. दुकानालगतच घरे असल्याने आग विझविणे फार जिकिरीचे होते. दुकानाचे बांधकाम संपूर्ण लाकडी असल्याने आग वाढत गेली आणि दोन्ही दुकाने आगीत भस्मसात झाली. महाडसह जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. (वार्ताहर)