गोळेगणी येथील मोरी उखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:34 PM2019-07-23T23:34:43+5:302019-07-23T23:35:14+5:30

बससेवा ठप्प : नागरिक त्रस्त; रस्ता वाहून गेल्याने चार गावांचा संपर्क तुटला

The gorge at Golgani was overthrown | गोळेगणी येथील मोरी उखडली

गोळेगणी येथील मोरी उखडली

googlenewsNext

प्रकाश कदम

पोलादपूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते असून नसल्यासारखे असल्याने अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांत या भागातील एसटी फेऱ्या बंद पडत असल्याचे वास्तव सातत्याने समोर येत आहे. मात्र, तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच गेली काही वर्षे राज्य शासनातर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कामकाज पारदर्शक असल्याचे भासविण्यात येत होते. मात्र, पोलादपुरात पारदर्शकचे पितळ उघडे पडले असून, २७ दिवसांत मोरीसह रस्ता उखडल्याने रविवार, सोमवारी या मार्गावरील बससेवा ठप्प झाली होती. यामुळे चार गावांचा संपर्क तुटला आहे. घटनास्थळाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोलादपूर येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली. त्या वेळी ग्रामस्थांनी हे काम निकृ ष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला.

पावसाळ्याच्या हंगामात सातत्याने पोलादपूरमधील ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय होत असल्याने बस चालविणे शक्य नसल्याचे पत्र सार्वजनिक खात्याला देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी चरई, वडाचा कोंड, रानवडी, घागरकोंड, बोरावळे आदी गावाकडे जाणाºया रस्त्याच्या अलीकडे पोलादपूर बाजूला आणि पलीकडे लाल मातीचा भराव करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सुमारे २०० मीटर्स अंतरावर हा लाल मातीचा आणि मुरमाचा भराव करण्यात आला होता. या वेळी एसटी सेवा ठप्प झाली होती, याची दखल प्रसिद्धी माध्यमांनी घेतल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी घेतली होती. नुकतीच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी पोलादपूर येथे अधिकाºयांची भेट घेत ग्रामीण भागातील रस्त्याबाबत आढावा घेतला होता. त्याचप्रमाणे कशेडी घाटामधील बोगद्याची पाहणी व माहिती घेत सूचना केल्या होत्या. मात्र, गेल्या चार वर्षांत पारदर्शकचा डांगोरा पिटणाºया या खात्याचे पितळ पोलादपूर-गोळेगणी मुख्य मार्गावरील मोरीसह रस्ता खचल्याने उघडे पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गोळेगणी गावाच्या आसपास पावसाचे पाणी रात्यावरून वाहून जाऊ नये यासाठी मोरीचे काम ‘क ’ गटातून करण्यात आले होते. यासाठी सुमारे लाखो रुपये खर्च झाले असून, ठेकेदाराने १५ जून रोजी या कामाला सुरुवात केली होती. मात्र, काही दिवसांतच निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे रविवारी झालेल्या पावसाने सिद्ध के ले आहे.पावसाचे पाणी रस्त्यावरून जोरात वाहत आल्याने रस्त्यावरील डांबरासह भराव वाहून गेला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांची पायपीट
या मार्गावरील कुडपण तसेच गोळेगणी, परसुले तुटवली, क्षेत्रपाल या गावाचा संपर्क तुटला असून, बससेवा बंद झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना पुढील गावात जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम खाते पोलादपूरसह इतर अधिकाºयांनी पाहणी के ली. २७ दिवस पूर्ण होत नाही तोच रस्त्यासह मोरी उखडल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हे काम जून २०१९ ला वर्कऑर्डर झाले. सध्या तात्पुरत्या स्वरूपात मोरीचे काम केले होते. पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. - व्ही. आर. बागुल, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलादपूर

Web Title: The gorge at Golgani was overthrown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.