शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

कोरोना नियंत्रणासाठी शासन, प्रशासन अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:25 PM

प्रवीण दरेकर यांचा आरोप : महाडमधील एमएमए कोरोना सेंटरची पाहणी करुन घेतली पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : कोरोना नियंत्रणाच्या कामामध्ये सरकारच्या कथनी आणि करनीमध्ये फरक आहे. कोणत्याही यंत्रणा परस्पर समन्वयाने काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती खालावत चालली आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्याबाबत शासन आणि प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

आ. प्रवीण दरेकर यांनी महाड औद्योगिक वसाहतीमधील एमएमए कोरोना सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. महाड, उत्पादक संघटनेचे (एम.एम.ए.) अध्यक्ष संभाजी पाठारे यांनी या सेंटरची माहिती त्यांना दिली. या वेळेस भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर आणि महाड येथील मनोज खांबे यांनी या कोरोना सेंटरच्या कामाबाबत अनेक तक्रारी केल्या. बिपीन म्हामुणकर यांनी या कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविणारे रॅकेट कार्यरत असल्याचा थेट आरोप केला.

या कोरोना सेंटरची पाहणी केल्यानंतर, महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या रॅकेटसंदर्भात दरेकर यांच्याकडे विचारणा केली असता, या प्रकाराची चौकशी करण्यास आपण सरकारला भाग पाडू, असे त्यांनी सांगितले. मात्र त्याच वेळेस शासनाने आश्वासन देऊनही या कोरोना केअर सेंटरला कोणतीही मदत न केल्याने हे सेंटर चालविताना एमएमएची दमछाक होत असल्याचा दावादेखील दरेकर यांनी केला.

रायगड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहोत, त्याचप्रमाणे आपत्ती निवारण योजनेतून महाड येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी ८४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी आपत्ती निवारण आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. कोरोना सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स नेमण्यात यावेत यासाठी आरोग्यमंत्र्यांशी आपण चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले. या वेळेस भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.रहिवाशांना भाड्याचीघरे उपलब्ध करून द्यातारिक गार्डन इमारतीमधील रहिवाशांचे सध्या हॉलमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याऐवजी शासनाने त्यांना भाड्याची घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेले असंख्य वादळग्रस्त आजही नुकसानभरपाईपासून वंचित असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.