प्रशासकीय कारभार महिलांच्या हाती

By admin | Published: August 19, 2015 11:59 PM2015-08-19T23:59:49+5:302015-08-20T00:01:16+5:30

महाडमध्ये प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार अशा प्रमुख शासकीय पदांवर ज्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यांनी

Governing Body | प्रशासकीय कारभार महिलांच्या हाती

प्रशासकीय कारभार महिलांच्या हाती

Next

महाड : महाडमध्ये प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार अशा प्रमुख शासकीय पदांवर ज्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चांगलीच छाप महाडकरांवर पाडली आहे. सध्या तालुक्याची ही जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे असून उत्तम प्रशासक म्हणून त्या कारभार सांभाळत आहेत.
रायगडच्या जिल्हाधिकारी म्हणून शीतल तेली-उगले यांनी दोन महिन्यांपूर्वी आपला पदभार हाती घेतला आहे. राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तालुका म्हणून महाडची जिल्ह्यात ओळख आहे. मात्र या तालुक्याच्या प्रमुख विभागाच्या प्रशासनाच्या कारभारी या तरुण महिला महाडच्या उपविभागीय पोलीस अधीक्षक पदावर प्रांजली सोनावणे यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी प्रथमच महिलेला काम करण्याची संधी सोनावणे यांच्या रूपाने मिळत आहे. महाडच्या प्रांताधिकारी म्हणून सुषमा सातपुते या वर्षभरापासून कार्यरत आहेत. सातपुते यांनी वर्षभराच्या काळात उपविभागात आपल्या कर्तृत्वाचा चांगला दबदबा निर्माण केला आहे. वाळू माफियांसह बेकायदा खनिकर्म उत्खनन करणाऱ्यांनाही सातपुते यांनी चांगलाच जरब बसवल्याचे दिसून येत आहे.
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी संघरत्ना खिलारे या महिला अधिकारी आॅक्टोबर २०१२ पासून प्रभावीपणे काम करत आहेत. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम करणाऱ्या एक अधिकारी म्हणून त्या तालुक्यात परिचित आहेत. (वार्ताहर)

Web Title: Governing Body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.