पनवेलमध्ये ‘शासन-प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:25 AM2018-12-10T00:25:40+5:302018-12-10T00:25:55+5:30

महापालिकेचा नवा उपक्रम : आयुक्तांनी साधला नागरिकांशी संवाद; घनकचरा व्यवस्थापनाविषयी चर्चा

The 'Government-Administration Your Dari' initiative in Panvel | पनवेलमध्ये ‘शासन-प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम

पनवेलमध्ये ‘शासन-प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम

googlenewsNext

पनवेल : ‘शासन-प्रशासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार पनवेल महापालिका आयुक्त देशमुख यांनी खारघर शहरातील विविध सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांशी रविवारी संवाद साधला. स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन पालिकेच्या मार्फत राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती या वेळी देण्यात आली. तसेच घनकचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पालिकेच्या स्थापनेला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. गणेश देशमुख यांनी सात महिन्यांपूर्वी पनवेलचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. सुरु वातीच्या काळात आचारसंहिता, त्यानंतर प्रशासनाची घडी बसविण्यातच त्यांचा कालावधी गेला. त्यामुळे आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्णय आयुक्त देशमुख यांनी घेतला आहे. त्याअनुषंगाने ‘आयुक्त आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत थेट नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. रविवारी या उपक्रमाअंतर्गत खारघरवासीयांशी संवाद साधण्यात आला. खारघरमधील हाईड पार्क, थारवानी हेरिटेज व केसर हार्मनी या सोसायट्यांच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला. महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेली झीरो गार्बेज मोहीम, घनकचरा व्यवस्थापन तसेच सध्याच्या घडीला सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती या वेळी देण्यात आली. या वेळी रहिवाशांनी काही सूचना केल्या. नागरिकांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन कार्यवाही गेली जाईल, अशी ग्वाही आयुक्त देशमुख यांनी या वेळी दिली.

प्रभाग समिती सभापती अभिमन्यू पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती लीना गरड, नगरसेवक नीलेश बाविस्कर, हरेश केणी, अजीज पटेल, गुरु नाथ गायकर, नगरसेविका नेत्रा किरण पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील तसेच प्रभाग अधिकारी भगवान पाटील, स्वच्छता निरीक्षक दौलत शिंदे, शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते. पालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन करणाºया ७४ वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी या वेळी दिली. यामुळे पालिका क्षेत्रात कोणत्या ठिकाणी किती कचरा संकलित केला जाणार आहे याची परिपूर्ण माहिती प्राप्त होणार आहे. सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनीदेखील या बैठकीला हजेरी लावली होती. पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने मंजूर झालेले प्रकल्प, नैसर्गिक स्रोत याचा पुरेपूर वापर करून शहरातील पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच तीन वर्षांच्या काळात शहरातील पाणीपुरवठ्याच्या योजना अमलात येणार असल्याचेही आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.

पालिकेमार्फत राबविण्यात येणाºया योजना, प्रकल्प आदीची माहिती या बैठकीत नागरिकांना देण्यात आली. प्रशासन व नागरिक संवाद हाच या उपक्रमाचा उद्देश आहे. नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे या बैठकीत सहभाग घेतला. भविष्यात पालिका क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून विविध प्रश्न मार्गी लावले जातील.
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल

आयुक्त स्वत: आमच्या सोसायटीत आले. त्यांनी आमच्याशी संवाद साधला. आमच्या सूचना ऐकून घेतल्या, तसेच पालिकेच्या मार्फत राबविण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. आयुक्तांनी घेतलेला पुढाकार खरोखरच स्तुत्य उपक्र म आहे.
- मंगेश रानवडे, पदाधिकारी,
हाईड पार्क सोसायटी, खारघर

Web Title: The 'Government-Administration Your Dari' initiative in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.