'जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा सरकारचा घाट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:36 AM2019-06-16T01:36:58+5:302019-06-16T01:37:09+5:30

सुनिल तटकरे यांचा आरोप; पाणी देण्याला विरोध

Government Ghat to shut down hydro power projects | 'जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा सरकारचा घाट'

'जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा सरकारचा घाट'

Next

अलिबाग : भिरा भिवपूरी येथील जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा आरोप रायगडचे नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरे यांनी केला. रायगडच्या जनतेच्या हक्काचे पाणी अन्यत्र कोठेही वळवून दिले जाणार नाही. त्याला कडाडून विरोध केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेमध्ये बैठक बोलावली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सह्याद्रीच्या कुशीतून कोकणात मोठ्या प्रमाणात पाणी येते. पश्चिमेकडे येणारे पाणी पूर्वकडे वळवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. वशिष्ठ, कुंडलीका, अंबा नदीचे पाणी अन्यत्र वळवण्यात येणार आहे. परंतू कोकणातील वाढत्या नागरिकरणासाठी, दुबार शेतीसाठी, उद्योगासाठी लागणारे पाणी हे मिळालेच पाहीजे. ते कोठेही जाऊ दिले जाणार नाही.

भिरा भिवपूरी येथील जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. तो हाणून पाडला जाईल. कारण भिरा, कोयना जलविद्युत प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी रायगडतील अंबा, कुंडलीका, वशिष्ठ नदीमध्ये जाते. त्याचा वापर जिल्ह्यात पिण्यासाठी शेतीसाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी होतो. तसेच येथे उत्पादीत होणारी स्वस्त विज मुंबईकरांना दिली जाते. त्यामुळे हे प्रकल्प बंद करण्याला कडाडून विरोध केला जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्हा परिषदेमध्ये तटकरे यांनी विविध विकास कामांच्या अनुशंगाने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सर्वप्रथम त्यांनी बएसएनएल सेवेचा जिल्ह्यात उडालेल्या बोजवाºयावर लक्ष केंद्रीत करत अधिकाºयांची कान उघाडणी केली. बीएसएनएलची बहुतांश कार्यालयेही भाड्याच्या जागेत आहेत. त्यांचे भाडे थकल्याने त्यांना टाळे लागल्याने काम होत नाहीत. तसेच काही कार्यालयांचे विजेचे बिल थकल्यानेही ब्रॉडबॅण्ड सेवा कोलमडून पडली आहे. यावर उपाय म्हणून त्यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांसाठी दुरसंचार मंत्र्याची भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट करुन महावितरणे बीएसएनएलची विज सेवा खंडी करुन नये असे निर्देश दिले.

लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर तटकरे यांनी विविध खात्यांच्या अधिकाºयांच्या बैठका घेतल्या. त्यामध्ये अलिबाग-विरार एक्सप्रेस कॉरीडॉर, मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, रेवस-रेड्डी या राष्ट्रीय महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

भिरा, कोयना जलविद्युत प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी रायगडमधील अंबा, कुंडलिका, वशिष्ठ नदीमध्ये जाते. त्याचा वापर जिल्ह्यात पिण्यासाठी शेतीसाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी होतो.
येथे उत्पादीत होणारी स्वस्त विज मुंबईकरांना दिली जाते. त्यामुळे हे प्रकल्प बंद करण्याला कडाडून विरोध केला जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Government Ghat to shut down hydro power projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.