शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

शासकीय वसतीगृहांना व निवासी शाळेला मिळेनात विद्यार्थी

By निखिल म्हात्रे | Published: January 07, 2024 8:03 PM

शासकीय वसतीगृह व निवासी शाळा प्रवेश क्षमता ७८०,  विद्यार्थ्यांचे प्रवेश ३५६.

अलिबाग - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या मागासवर्गीय मुलामुलींसाठी रायगड जिल्ह्यात सात शासकीय वसतिगृहे आहेत. या वसतीगृहांची विद्यार्थी प्रवेश क्षमता ५८० आहे. मात्र सध्या या सात वसतीगृहांमध्ये सन २०२३/२४ या वर्षात फक्त ३०१ विद्यार्थी असून, २७९ जागा रिक्त आहेत. तर एक शासकीय निवासी शाळेची क्षमता २०० असताना तेथे फक्त ५५ प्रवेश झाले आहेत. २०१८ मध्ये एका शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या जागांवर अन्य मार्गासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंद करण्यात आले, त्यामुळे शासकीय वसतीगृहातील प्रवेश कमी झाले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत.आठवीपासून पुढे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गातील तसेच अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश दिला जातो. वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नाष्टा-भोजन, शैक्षणिक साहित्य, गणवेश, प्रकल्प, कार्यशाळा, इतर शैक्षणिक साहित्य आणि उपक्रमासाठी भत्ता दिला जातो. क्रीडा साहित्य विभागामार्फत देण्यात येते. तर वसतीगृहात दूरसंचार संच संगणक इंटरनेट, अवांतर वाचनासाठी पुस्तके आदी सुविधा देण्यात येतात.

रायगड जिल्हयात सामाजिक न्याय विभागाच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुले व मुलींसाठी एकूण सात शासकीय वसतीगृहे तर मुलांकरिता एक शासकीय निवासी शाळा आहे. अलिबागमधील मुलांच्या शासकीय वसतीगृहाची क्षमता ७५ आहे. मात्र यावर्षी म्हणजेच सन २०२३/२४ वर्षात फक्त २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. तर अलिबागमध्येच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ठया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह असून, त्याची क्षमता ८० असताना यावर्षी फक्त १९ प्रवेश झाले आहेत. तळा तालुक्यात मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाची क्षमता १०० असून, तेथे फक्त २६ प्रवेश झाले आहेत. महाडमधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाची क्षमता १०० असून तेथे ९७ तर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाची ७५ क्षमता असताना तेथे ५२ प्रवेश झाले आहेत. पनवेलमध्ये मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाची क्षमता ७५ असून तेथे ५२ विद्यार्थांनी प्रवेश घेतला आहे. सुधागडमधील  मागासवर्गीय व आर्थिकदृष्ठया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाची क्षमता ७५ असून तेथे फक्त २१ प्रवेश झाले आहेत. अशा प्रकार या सात शासकीय वसतीगृहांची विद्यार्थी क्षमता ५८० आहे. मात्र सध्या तेथे ३०१ विद्यार्थांनी प्रवेश घेतला असून २७९ जागा रिक्त आहेत. तर माणगाव तालुक्यातील जावळी येथे अनुसूचित जाती, नवबाैद्ध मुलांकरिता शासकीय निवासी शाळा असून या शाळेची क्षमता २०० असताना सध्या तेथे ५५ प्रवेश झाले आहेत.

शासकीय वसतीगृहात अनुसूचित जातीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८० टक्के जागा आरक्षित असतात. तर उर्वरित जागा या अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी असतात. संपूर्ण कोकणात अनुसूचित जातीच्या लोकसंख्या फक्त सुमारे ५ ते ६ टक्के आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्याही कमी असते. २०१८ पूर्वी अनुसूचित जातीचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास रिक्त जागांवर अन्य मागास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. मात्र २०१८ मध्ये शासनाने एक शासन निर्णय काढून अनुसूचित जाती आरक्षित जागांवर अन्य मागास वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये असे निर्देशित केले आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग