NDRF च्या बेस कॅम्पसाठी सरकारी जमीन, आदिती तटकरेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 06:41 PM2021-07-28T18:41:26+5:302021-07-28T18:42:03+5:30

Aditi Tatkare : रायगड जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनादेखील आपत्ती काळात तातडीच्या बचाव व मदतकार्यास महाड येथे होणाऱ्या बेसकॅम्पमुळे उपयोग होणार आहे.

Government land for NDRF base camp, information from Aditi Tatkare | NDRF च्या बेस कॅम्पसाठी सरकारी जमीन, आदिती तटकरेंची माहिती

NDRF च्या बेस कॅम्पसाठी सरकारी जमीन, आदिती तटकरेंची माहिती

googlenewsNext

रायगड :  जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफच्या बेस कॅम्पसाठी आवश्यक असणारी सुमारे पाच एकर सरकारी जमीन दुग्धव्यवसाय विभागाने देण्याबाबत सहमती दर्शविली आहे. याबाबत आज (दि.28 जुलै ) रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित झाल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग हे तीन जिल्हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिसंवेदनशील आहेत. 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापूरामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत बचाव व मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दल हे मध्यवर्ती स्थळी कायमस्वरुपी तैनात असणे गरजेचे असल्याचे प्रकर्षाने अधोरेखित होते, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी सरकारी जागा मिळावी, यासाठी दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनादेखील आपत्ती काळात तातडीच्या बचाव व मदतकार्यास महाड येथे होणाऱ्या बेसकॅम्पमुळे उपयोग होणार आहे. वातावरणीय बदल, चक्रीवादळ, दरड कोसळणे, अतिवृष्टीमुळे होणारी पूरपरिस्थिती, भू-सख्खलन आदी परिस्थितीत दुर्देवी घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी हे एनडीआरएफ पथक लाभदायी ठरेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

Web Title: Government land for NDRF base camp, information from Aditi Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.