मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 03:48 AM2018-07-29T03:48:28+5:302018-07-29T03:49:02+5:30

मराठा आरक्षणाबाबत राज्यात फार मोठा असंतोष पसरत आहे. या समाजाचे महाराष्ट्रात फार मोठे मोर्चे निघाले.

 Government should take a positive note regarding Maratha reservation - Sunil Tatkare | मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी- सुनील तटकरे

मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी- सुनील तटकरे

Next

रोहा : मराठा आरक्षणाबाबत राज्यात फार मोठा असंतोष पसरत आहे. या समाजाचे महाराष्ट्रात फार मोठे मोर्चे निघाले. ते अत्यंत शांत पद्धतीने झाल्याचे संपूर्ण देशाने पाहिले असून, सकल मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत युती सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सुनील तटकरे यांनी रोहे येथे केले.
रोहा-अष्टमी नगरपरिषदे तर्फे विविध विकासकामांचे उद्घाटन, नामकरण व भूमिपूजन सोहळा कार्यक्रम प्रसंगी सभेत ते बोलत होते. या वेळी आ. अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, रोहा तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मधुकर पाटील, पं.स. सभापती राजेश्री पोकळे, उपसभापती विजया पाशिलकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय मोरे, शहराध्यक्ष अमित उकडे आदी उपस्थित होते.
देशासाठी योगदान दिलेले मौलाना अबुल कलाम आझाद यांचा देशाच्या उभारणीत फार मोठा हिस्सा होता. त्यांनी स्वातंत्र्य काळात व नंतरही फार मोठे काम केले. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शासनाची आर्थिक संस्था स्थापन झाल्यावर समाजाच्या आर्थिक समतेसाठी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. संस्थेला अर्थमंत्री असताना १०० कोटी निधी उपलब्ध करून दिल्याचे तटकरे यांनी सांगितले.
गीतेचे थोर उपासक, सर्वधर्मीयांना प्रेरणा देणारे पांडुरंगशास्त्री आठवले व प्रचंड बुद्धिमत्ता, महान आकलनशक्ती व विद्वत्ता असलेले माजी अर्थमंत्री व भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्यामुळे रोह्याचा नावलौकिक झाला आहे.
रोह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार पाणी, वीज, रस्ते पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे. रोहा शहरात खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. तसेच कुंडलिका नदी संवर्धनाचे कामही हाती घेण्यात आले असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

Web Title:  Government should take a positive note regarding Maratha reservation - Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड