शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील, कृषिमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 01:39 AM2020-01-24T01:39:22+5:302020-01-24T01:40:01+5:30
दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ केले आहे. त्याचप्रमाणे दोन लाख रुपयांवरील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे आणि जे शेतकरी नियमित पीक कर्जाचे हप्ते परतफेड करत आहेत.
अलिबाग : दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ केले आहे. त्याचप्रमाणे दोन लाख रुपयांवरील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे आणि जे शेतकरी नियमित पीक कर्जाचे हप्ते परतफेड करत आहेत. त्यांचीही कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे दिली.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना येणाºया अडचणी, समस्यांचे निवारण करणे, योग्य सल्ला देणे, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकºयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर जिल्हा नियोजन भवनमध्ये त्यांच्या हस्ते प्रगतिशील शेकºयांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या जीवनशैलीतून समाजाला अन्नधान्य व उपजीविका पुरवली जाते. शेती ही त्याची जीवनपद्धती असल्याने त्यांनी त्याकडे कधीही व्यवसाय म्हणून पाहिले नाही. फायदा, नुकसान काहीही झाले तरी तो तेवढ्याच उमेदीने पुढच्या वर्षी पुन्हा कामाला लागतो. याच पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत त्यावर ओढवणाºया समस्यांचे ओझे सुसह्य करणे आणि त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शेतकºयांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे भुसे यांनी सांगितले.
सरकारने शेतकºयांचा हितासाठी शेतकरी कर्जमाफी योजना राबविली आहे. या योजनेतून दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे. त्याचा लाभही जिल्ह्यातील शेतकºयांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. दोन लाख रुपयांवरील ज्या शेतकºयांचे पीक कर्ज आहे आणि जे शेतकरी नियमित पीक कर्जाचे हप्ते परतफेड करत आहेत. त्यांचीही कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतकºयांच्या शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्याकरिता सरकारच्या विविध यंत्रणांकडून शेतकºयांसाठी राबवण्यात येणाºया योजनांच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधून त्यांचे सनियंत्रण करण्यासाठी तालुका स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कक्षाला भेट देणाºया सर्व शेतकºयांची नोंदी ठेवण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
राज्यात आज जवळपास ५०० पेक्षा अधिक कार्यालयात या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. शेतकºयांना कमीत कमी खर्चात उत्पादन कसे घेता येईल, त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी वाहन व्यवस्था, मालाला योग्य दर मिळणे, मालाची साठवणूक करून ठेवण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत. त्या देण्यासाठी सरकार स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील, असेही भुसे यांनी सांगितले. या वेळी आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, कृषी अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन तत्पर-बैनाडे
जुन-जुलैमध्ये जिल्ह्यात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून आलेली १६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकºयांना वाटप करून झाली आहे. अद्यापही सहा कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासन नेहमीच शेतकºयांच्या मदतीसाठी तत्पर आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील, अशी हमी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिली.
प्रगतशील शेतकºयांचा सन्मान
याप्रसंगी प्रगतशील शेतकºयांचा सत्कार कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. उत्तम पाटील, कुसुंबळे ता. अलिबाग, मकरंद अरविंद आठवले नागाव, ता. अलिबाग, सतीश कृष्णा म्हात्रे, कार्ले, ता. अलिबाग, प्रकाश कृष्णा पाटील, सातघर, ता. अलिबाग, महादू बाळू सुतक, आधरणे, ता. पेण, बळीराम बाळू पाटील, गागोदे, ता. पेण आणि अनंत चिंधू डिंगळे, वाकरुळ, ता. पेण या प्रगतशील शेतकºयांचा समावेश होता.