शासनाचा कोटींचा महसूल थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:15 AM2020-07-29T00:15:35+5:302020-07-29T00:16:59+5:30

पनवेल तहसील कार्यालयाला शेतसाऱ्याच्या माध्यमातून २८ कोटींचा महसूल गोळा होत असतो. यामध्ये कृषित, आकृषित करासह विविध करांचा समावेश असतो.

Government's crores of revenue stopped | शासनाचा कोटींचा महसूल थकला

शासनाचा कोटींचा महसूल थकला

Next

वैभव गायकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : कोरोनाच्या संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय यंत्रणा सध्याच्या घडीला कामाला लागल्या आहेत. मात्र, दुसरीकडे शासनाची तिजोरी रिकामी होताना दिसत आहे. महसूल विभाग व पालिकेच्या करवसुली विभागाची मोहीम ठप्प पडली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होताच, या यंत्रणांना करवसुलीकडे आपला मोर्चा वळवावा लागणार आहे.
पनवेल तहसील कार्यालयाला शेतसाऱ्याच्या माध्यमातून २८ कोटींचा महसूल गोळा होत असतो. यामध्ये कृषित, आकृषित करासह विविध करांचा समावेश असतो. मार्च शेवटीपर्यंत हा कर महसुलात गोळा होत असतो. मात्र, या वर्षी कोरोनाचे सावट त्यानंतर घोषित केलेले लॉकडाऊन, यामुळे मागील वर्षासह नव्या वर्षाची करवसुली रखडली आहे. पनवेल पालिकेकडे मालमत्ता कराच्या रूपात दरवर्षी सुमारे ३४ कोटींपेक्षा जास्त कर जमा होतो. मागील वर्ष संपून नवीन वर्ष सुरू झाले असले, तरी पनवेल महानगरपालिकेची अद्याप सन २0१९-२0 या मागील वर्षाची सुमारे ५0 टक्के मालमत्ता कराची थकबाकी शिल्लक असल्याचे समोर आले आहे. पनवेल महानगरपालिकेने मागील वर्षी नव्याने मालमत्ता सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. सुमारे ३ लाख मालमत्तांचे सर्वेक्षण मालिकेने पूर्णही केले. मात्र, कोरोनाच्या साथीअभावी मालमत्ता करवसुलीचे काम पूर्ण पणे ठप्प झाले आह. या वर्षी पालिकेने सिडको वसाहतींनाही नव्याने करप्रणाली लागू केली होती.
३ लाखांपेक्षा जास्त सदनिकाधारकांचा अंदाज व्यक्त करीत पालिकेच्या तिजोरीत १00 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर जमा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या वर्षीचा मालमत्ता कर सोडाच, मागील वर्षीचे ५0 टक्के म्हणजे जवळजवळ १७ कोटी रुपये अद्याप पालिकेला मालमत्ता कराच्या रूपाने येणे बाकी आहे.

सर्व यंत्रणा कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लागली आहे. पालिकेमार्फत मालमत्ता सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सप्टेंबर महिन्यानंतरच कर मालमत्ता करवसुली केली जाईल.
- संजय शिंदे, उपायुक्त,
पनवेल महानगरपालिका

Web Title: Government's crores of revenue stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.