महाड : कर्नाटकमधील राज्यपालांनी आपली जागा पंतप्रधान मोदी यांना देऊन राजीनामा दिला होता, त्यामुळे मोदी जे सांगतील तेच ते ऐकणार यामुळे काँग्रेस आणि जे.डी.एस. सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत असले तरी त्यांचे राज्यपाल ऐकणार नाहीत, असे स्पष्टोक्ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.रायगड दौऱ्याअंतर्गत अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुधवारी महाडमध्ये आगमन झाले. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात असलेल्या गड- किल्ल्यांच्या दुरवस्थेवर बोलताना त्यांनी अस्तित्वात असलेले गड-किल्ले जतन करणे हीच खरी शिवसृष्टी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाडच्या दौºयाला कार्यकर्ते व नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पदाधिकारी भेटी घेत पक्षबांधणीचे काम करीत आहेत. रायगडमध्ये मनसेला पाय रोवण्यास सक्षम पदाधिकारी न मिळाल्याने मनसेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली. या पार्श्वभूमीवर या दौºयात राज ठाकरे नवी भूमिका काय घेतात, याकडे लक्ष लागून राहिले असतानाच राज ठाकरे यांचे केवळ धावते दौरे झाल्याने मनसेचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.ठाकरे यांनी महाडच्या छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला आणि चवदार तळे येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. या वेळी त्यांच्या समवेत माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते अविनाश अभ्यंकर, खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर आदी उपस्थित होते.>राज ठाकरे यांचा संवाद दौराम्हसळा /श्रीवर्धन : कोकणातील जनतेने आपल्या जागा-जमिनी विकू नये. मात्र, नोकरी करण्यासाठी आपल्याच राज्यातील मुंबईला या, असा आव्हानात्मक सल्ला राज ठाकरे यांनी श्रीवर्धन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मोर्चेबांधणी व कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आयोजित दौºयादरम्यान ठाकरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. म्हसळ्यात स्वागत कार्यक्र माशिवाय काहीच झाले नाही, त्यानंतर काही मिनिटातच गाड्यांचा ताफा श्रीवर्धनकडे रवाना झाला. त्यामुळे परिसरातील कार्यकर्ते नाराज झाले.
मोदी सांगतील तेच कर्नाटकचे राज्यपाल ऐकतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 2:53 AM