राज्यपाल आज कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर
By admin | Published: March 17, 2016 02:26 AM2016-03-17T02:26:39+5:302016-03-17T02:26:39+5:30
राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव हे १७ मार्चला कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील आदिवासी लोकांना त्यांची वहिवाट असलेल्या दळी जमिनीचे
कर्जत : राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव हे १७ मार्चला कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील आदिवासी लोकांना त्यांची वहिवाट असलेल्या दळी जमिनीचे वाटप करण्यासाठी ते कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये आयोजित कार्यक्र माला उपस्थित राहणार आहेत.
अनेक पिढ्या वहिवाट असलेल्या दळी जमिनीचे मालक व्हावे यासाठी आदिवासी लोकांचा अनेक वर्षे लढा सुरु होता. राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर विद्यासागर राव यांनी आदिवासी समाजाच्या दळी जमिनीचा विषय प्राधान्याने लक्ष देवून त्यांना त्या जमिनीचे मालक होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील ५३ आदिवासी वाडीतील ७६१ दळी जमिनीवर राहत असलेल्या दळीधारकाला १०५३ हेक्टर जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप केले जाणार आहे. खालापूर तालुक्यातील ५७ आदिवासी वाडीमधील ३५१ दळीधारकांना तब्बल १०८७ हेक्टर जमिनीच्या पटट््यांचे वाटप राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते केले जाणार आहे. तालुक्यातील भालिवडी येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये आयोजित कार्यक्र मासाठी राज्यपाल १७ मार्चला सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने भिवपुरी येथील टाटा कंपनीच्या हेलिपॅडवर उतरतील. तेथून ११.२० वाजता मुख्य कार्यक्र म स्थळी पोहचणार असून १२.३० वाजता मुंबईला रवाना होणार आहेत. या कार्यक्र माला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, स्थानिक आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, राज्यपालांच्या कार्यालयाचे उपसचिव परिमल सिंग आदींची उपस्थिती असणार आहे.