कणसांनी डोईभार झाले भातपीक

By admin | Published: September 12, 2016 03:23 AM2016-09-12T03:23:17+5:302016-09-12T03:23:17+5:30

निसर्गचक्रातील बदल हे ठरलेले असतात. दिसमास पूर्ण झाल्यावर नव्याची नवलाई दाखविणे असताना हा निसर्गाचा गुणधर्म गौरी गणपती सणांचा आनंद

The grains are loaded with rice bowl | कणसांनी डोईभार झाले भातपीक

कणसांनी डोईभार झाले भातपीक

Next

पेण : निसर्गचक्रातील बदल हे ठरलेले असतात. दिसमास पूर्ण झाल्यावर नव्याची नवलाई दाखविणे असताना हा निसर्गाचा गुणधर्म गौरी गणपती सणांचा आनंद उपभोगीत असताना देशाचा अन्नदाता बळीराजासुद्धा मनोमन आनंदी झाला. या आनंदाचे महत्त्वाचे कारण म्हणजे भातशेतीमध्ये कणस डोईभार झाली असून सध्या वाऱ्याच्या मंद झुळूकीबरोबर डोलू लागलीत. हलव्या प्रकारातील भात प्रजातीची ७० ते ९० टक्के दिवसांच्या कालावधीतील भाताला कणसं आली असून सध्या निपजलेल्या दाण्यामध्ये तांदूळ बनण्याची प्रक्रिया म्हणजे दूध भरणी सुरू आहे. जसजसा दाणा पक्व होईल तसतसा शिवाराचा हिरवा रंग सोनेरी रंगाचा पट्टा तयार होईल. अन्नपूर्णा शिवारावर प्रसन्न झाली असून विजयादशमीपर्यंत शिवारात सोने लुटायची प्रक्रिया सुरू होईल.
शेतकरी बांधवांसाठी हवामानशास्त्र विभागाने गुड न्यूज दिली असून मान्सूनची परतीचा प्रवास सुरू होण्याची वेळ येवून ठेपली आहे. कोकण पट्ट्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली असून बहुतांशी आकश निरभ्र असेल. सध्या पहाटे पडणारं दव हे गर्भधारणा अवस्थेतील पिक व कणसांत दूध भरण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक औषधी मात्रा असल्याने पिकांवरील किडरोगांचे समूळ उच्चाटन करणारे आहेत. शिवारात पिकांचे ताटवे व माळरान गवतावर दवभार झालेल्या गवताच्या पाल्यावर मोत्यासारखे चमचमणारे दवबिंदू, दवांचा होणारा वर्षाव हा ऋ तू बदलनाच्या नैसर्गिक खुणा आहेत. येणारा नवरात्रोत्सवात आदिमायेच्या घटस्थापनेप्रसंगी शिवार धनधान्यांनी समृद्ध होणार आहे. यंदाचा मान्सून हंगाम पिकांसाठी शंभर टक्के अनुकूल झाल्याने वर्षा ऋ तूला निरोप देताना बाप्पाच्या अनंत चतुर्दशीनंतर, शिवारात लगबग वाढणार आहे.
हलक्या जातीची भातपिकं परिपक्व झाल्यावर त्याची कापणी न मळणी (झोडणी) एकाचवेळी क रण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हिटसारखे ऊन पडत असल्याने प्रसवलेली कणसं, दाणा भरणी व रंगरूप पालटण्यास कमी वेळ घेतात. (वार्ताहर)

Web Title: The grains are loaded with rice bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.