ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 02:57 AM2018-04-26T02:57:21+5:302018-04-26T02:57:21+5:30

१८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका : जिल्ह्यात राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी ऐन रंगात

Gram panchayat Dhimdhoom elections | ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम

ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम

Next

विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील १८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका मे अखेरपर्यंत घेण्यात येत असून त्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. निवडणूक होणार्या या १८७ ग्रामपंचायती पैकी अलिबाग तालुक्यांत १५, पोलादपूर-१७, श्रीवर्धन-०६, कर्जत-०५, खालापूर-२२, महाड-२१, सुधागड-१४ , मुरूड-१४, म्हसळा १२, पेण-०८, रोहा-०७, पनवेल-१४, तळा-०६, माणगांव-२५, तर उरण मध्ये एक ग्रामपंचायत आहे.
ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामस्तरावरील अत्ंयत महत्वाचे सत्तास्थान असल्याने आणि त्या आधारेच पूढील सर्व निवडणूकांतील राजकीय पक्ष सामर्थ्य निश्चित होत असल्याने, जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, भाजपा,शिवसेना आणि भाजपा आदि प्रमुख राजकीय पक्षांची ग्रामपंचायत निवडणूकीकरिता मोर्चे बांधणी केली आहे. वाढत्या उन्हाळ््या बरोबर राजकीय तप्तता देखील वाढीस लागली आहे.

मुरुड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
आगरदांडा : मुरु ड तालुक्यात होणाऱ्या १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आधिसूचना जारी केली असून, आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर-२०१८ दरम्यान मुदत संपणाºया व नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर करण्यात आला आहे. यात जनतेतून थेट सरपंच निवडणुकीचाही समावेश आहे. मुरु ड तालुक्यातील आगरदांडा, राजपुरी, शिर्घे, विहूर, नादगाव, काशीद, बोर्ली, भोईघर,
मांडला, चोरढे, वळके, तळेखार, मिठेखार, साळाव या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

७ ते १२ मे
सकाळी ११ ते ४.३० वाजेपर्यंत तहसीलदार कार्यालयात नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ राहील.
१४ मे
सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालयात उमेदवारांनी भरलेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल.
१६ मे रोजी
दुपारी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची वेळ व त्यानंतर चिन्हवाटप करण्यात येणार आहे.
२७ मे रोजी
सकाळी ७.३० वाजल्यापासून ते सायंकाळी ५.३०वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.
२८ मे रोजी
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची मतमोजणी होईल.
 

Web Title: Gram panchayat Dhimdhoom elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.