अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकांना अद्यापही एक वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडत आहेत. जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल १८७ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. प्रभाग रचना व आरक्षण, हरकती व सूचना मागवणे आणि प्रभाग रचना अंतिम करणे अशा तीन टप्प्यांच्या पूर्ततेसाठी निवडणूक आयोगाने काम सुरू केले आहे. माणगाव, खालापूर आणि महाड या तीन तालुक्यांतील सर्वाधिक ६८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे, तर उरण तालुक्यातील जासई या एकाच ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा बार उडणार आहे.निवडणुकीच्या कामाला निवडणूक विभागाने तयारी केली असताना दुसरीकडे विविध राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सरपंचपदाचाही निवडणूक थेट होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ८०६ ग्रामपंचायती आहेत. विविध ग्रामपंचायतींची मुदत वेगवेगळ््या कालावधीत संपल्यानंतर तेथे निवडणूक विभाग निवडणुकांची तयारी करते. जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये १५ तालुक्यातील तब्बल १८७ ग्रामपंचायतींचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानुसार तेथे निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. ७ मार्च ते २० मार्च २०१८ या कालावधीमध्ये प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात २१ मार्च ते ५ एप्रिल २०१८ या कालावधीत हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. तिसºया टप्प्यामध्ये म्हणजे ११ एप्रिल ते १३ एप्रिल २०१८ या कालावधीमध्ये प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदानाची तारीख जाहीर होणार आहे.राज्यात तब्बल ६५६ ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहेत. रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायती, तर ठाणे जिल्ह्यातील ११ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दोनच ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:47 AM