अलिबाग: ग्रामपंचायती निवडणुकीत आघाडीचे वर्चस्व; वेश्र्वि आणि नवेदर नवगावमध्ये आघाडीचे सरपंच
By राजेश भोस्तेकर | Published: October 17, 2022 01:06 PM2022-10-17T13:06:57+5:302022-10-17T13:07:54+5:30
शेकापला धक्का
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग :अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठेची ठरलेली वेश्र्वि ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यात ग्राम परिवर्तन आघाडीला यश आले आहे. आघाडीचे सरपंच पदाचे गणेश गावडे हे १८१ मताने विजयी झाले आहेत. तर नवेदर नवगाव मध्येही आघाडी चा करिश्मा पाहायला मिळाला. प्रियाती घातकी या ५०० मताने विजयी झाल्या आहेत. या विजयामुळे शेकापला मोठा धक्का बसला आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी दोन्ही ग्रामपंचायत मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
अलिबाग तालुक्यातील वेश्र्वि, नवेदर नवगाव आणि कोप्रोली या तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पैकी कोप्रोली ग्रामपंचायत रद्द झाली होती उर्वरित दोन ग्रामपंचायती साठी रविवारी १६ ऑक्टोंबर रोजी मतदान झाले. सोमवार १७ ऑक्टोंबर रोजी अलिबाग तहसीलदार कार्यालयात मतमोजणी पूर्ण झाली. आघाडीला दोन्ही ग्रामपंचायत मध्ये विजय मिळाला आहे.
वेश्र्वि ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरली आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि शेकापचे आमदार जयत पाटील याच्या वर्चस्वाची लढाई याठिकाणी होती. गेली अनेक वर्ष वेश्वि ग्रामपंचायतीवर शेकापची सत्ता होती. ही सत्ता उलथून टाकण्यास आघाडीला यश आले आहे. तर नवेदर नवगाव मध्येही गेली अनेक वर्ष प्रशासन होते. याठिकाणी ही आघाडीने मुसंडी मारून शेकापला नामोहरम केले आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"