ग्रामपंचायत निवडणूक : वदप, गौरकामतमध्ये राष्ट्रवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:15 AM2018-02-27T02:15:41+5:302018-02-27T02:15:41+5:30

तालुक्यातील वदप व गौरकामत ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी पार पडल्या. ८१ टक्के मतदान या निवडणुकीत झाले. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुका पहिल्यांदाच थेट पद्धतीने झाल्या.

 Gram panchayat elections: VDP, Nationalist in Gaurakam | ग्रामपंचायत निवडणूक : वदप, गौरकामतमध्ये राष्ट्रवादी

ग्रामपंचायत निवडणूक : वदप, गौरकामतमध्ये राष्ट्रवादी

Next

कर्जत : तालुक्यातील वदप व गौरकामत ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी पार पडल्या. ८१ टक्के मतदान या निवडणुकीत झाले. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुका पहिल्यांदाच थेट पद्धतीने झाल्या. सोमवारी मतमोजणी झाली त्यामध्ये दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच निवडून आले, तसेच वदप ग्रामपंचायतीत ९ पैकी ७ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आणि शिवसेनेला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले तर गौरकामत ग्रामपंचायतीत ९ पैकी ८ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आणि एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराने बाजी मारली. शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
वदप व गौरकामत ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी कर्जत तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता सुरू झाली आणि ११ वाजता पूर्णही झाली. गौरकामत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगेश भाऊ देशमुख यांनी ९६८ मते मिळवून एकतर्फी निवडणूक जिंकली. त्यांनी धनाजी तानाजी रेवाळे यांचा ३२३ मतांनी पराभव केला तर गेल्या वर्षी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा तर्फे निवडणूक लढविलेल्या रमेश परशुराम चव्हाण यांना अवघी १२५ मते मिळाली त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. या ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुणाल चिंचोळे यांनी काम पाहिले त्यांना अनिल नागभिडकर आणि मेघा अंकमवार यांनी सहकार्य केले.
वदप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक मात्र चुरशीची झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीरा ज्ञानेश्वर विचारे यांनी शिवसेनेच्या भीमा काशिनाथ उघडे यांचा अवघ्या ३७ मतांनी पराभव केला. विचारे यांना ६६० तर उघडे यांना ६२३ मते मिळाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे या आपल्या पोलीस कर्मचाºयांसह जातीने उपस्थित होत्या.
या ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिजित अरविंद खैरे यांनी जबाबदारी पार पाडली तर त्यांना समीर अशोक पिंपळे आणि गणेश किशनराव मुंढे यांनी सहकार्य केले.

गौरकामत ग्रामपंचायतीत निवडून आलेले सदस्य -
प्रभाग १
किरण पवार (४१५)
सुमन वाघमारे (३४५)
अर्चना रोकडे (बिनविरोध)
प्रभाग २
संतोष गुरव (४८५)
सागर देशमुख (३११)
सुगंधा मिसाळ (४१७)
प्रभाग ३
शरद वाघमारे (२४५)
मालती वाघमारे (२४९)
समिधा गांगल (२६८)

वदप ग्रामपंचायतीत निवडून आलेले सदस्य-
प्रभाग १
आशा शिंदे (३७८)
लीलाधर गायकवाड (२६१)
मीना मुकणे (३४१)
प्रभाग २
सुनील पवार (२९४ )
स्वाती पाटील (२७३)
प्रिया पाटील (२८४)
प्रभाग ३
बाबल्या वाघचौरे (१४८)
वर्षा व्होले (१५२)
मनीषा पाटील (१५८)

 

Web Title:  Gram panchayat elections: VDP, Nationalist in Gaurakam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.