माणगाव : सोन्याच्या वाडीतील ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून आजच्या आज तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तयार करून पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिंचवलीच्या सरपंच श्रुती कालेकर आणि ग्रामविकास अधिकारी गणेश खातू यांना दिल्या. गरिबातल्या गरिबाकडे स्वत:चे हक्काचे घर असावे असे वक्तव्य पालकमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण यांनी पूरग्रस्त सोन्याच्या वाडीतील ग्रामस्थांना भेटीला आले तेव्हा काढले.चिंचवली ग्रमपंचायत हद्दीतील सोन्याची वाडी ही पूरग्रस्त आहे. दरवर्षी या ठिकाणी पूर येत असतो आणि संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा बसत असतो. या वेळी आलेल्या महापुरानंतर प्रशासनाने या वाडीतील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले होते. आठ दिवसांनी पूर ओसरल्यावर हे ग्रामस्थ आपल्या घरी गेले. परंतु असा प्रसंगी वारंवार होत असल्याने या ग्रामस्थांना या जागेतून कायमचे विस्थापित करणे हाच पर्याय असल्याने ग्रामस्थांनी या वेळी पालकमंत्री यांना त्याबाबतचे निवेदन दिले.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी या वाडीला भेट देऊन, ग्रामस्थांशी चर्चा केली. या वेळी जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले, तालुकाध्यक्ष संजय ढवळे, तालुका पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष नाना महाले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, विभागीय अध्यक्ष युवराज मुंढे, जहेंद्र मुंढे, तहसीलदार प्रियांका अहिरे, गट विकास अधिकारी सतीश गाडवे, सरपंच श्रुती कालेकर आदींसह उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून स्थलांतरण ही विशेष बाब म्हणून योग्य जागा उपलब्ध आहे का, याची खात्री करून, आजच्या आज पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचे प्रस्ताव तयार करून ते पाठविण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. तसेच या ग्रामस्थांच्या मागणीनुसार गेली दोन पिढ्या करीत असलेल्या शेतीस कसत असलेल्या शेतकऱ्यांची नावे लावण्याच्या सूचनाही तहसीलदारांना केल्या.नागोठणेतील पूरग्रस्त भागाची पाहणीनागोठणे : रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी दुपारनंतर नागोठण्यात येऊन शिवाजी चौक, बाजारपेठ, कोळीवाडा पूरग्रस्त भागात फिरून पाहणी केली. यापूर्वी पालकमंत्र्यांनी रोहा शहराला भेट दिल्यानंतर नागोठण्यात येत असताना अलीकडेच येथील अंबा नदीत पडून वाहून गेलेल्या वरवठणे गावातील संतोषचे मामा गणपत म्हात्रे यांचे, तसेच संतोषच्या आईची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. नागोठण्यात शिरताना कोकणरत्न पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या सूचनेनुसार पालकमंत्र्यांनी अंबा नदीवर असलेल्या ४०० वर्षांपूर्वीच्या पुलाची पाहणी केली. या वेळी मोरे यांनी या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली. चव्हाण यांनी शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना सचिन मोरे आणि प्रशांत मोरे यांच्या गणपती कारखान्यांना आवर्जून भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली. शहरात पुराचे पाणी शिरलेल्या सर्व घरांचे तसेच दुकाने, टपरी यांचे तातडीने पंचनामे करून घ्यावेत, असा आदेश सरकारी अधिकाऱ्यांना दिला. या पाहणी दौºयात माजी मंत्री रवि पाटील यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, माजी जि. प. सदस्य मारुती देवरे, संजय कोनकर आदी उपस्थित होते. नागोठणेनंतर विभागातील बेणसे, शिहू, चोळे, गांधे, झोतीरपाडा आदी गावांना पालकमंत्र्यांनी भेट दिली.
पूरग्रस्त सोन्याच्या वाडीतील स्थितीची पाहणी, ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून प्रस्ताव पाठवावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 2:53 AM