महाड : तालुक्याचा ९३.१५ टक्के निकाल लागला असून शहरी भागांतील विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बाजी मारली. तालुक्यामध्ये एकूण ४४ परीक्षेची केंद्रे होती. त्यामध्ये ३,१७३ विद्यार्थ्यांपैकी २,९५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील बहुतेक शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला असून नऊ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नऊ शाळेतील विद्यार्थी शंभर टक्के उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये नवयुग मराठी माध्यमिक विद्यालय (लाडवली), न्यू इंग्लिश स्कूल (निगडे), उड्रे इंग्लिश स्कूल (अ. तुडील), न्यू इंग्लिश स्कूल (लोअर तुडील), शेख हुसेन काझी इंग्लिश स्कूल (महाड), समर्थ रामदास विद्यालय, जय जवान जय किसान (वाघेरी), सेन्ट झेवियर विद्यालय, गुरुकुल अॅकेडमी, खरवली माध्यमिक विद्यालय यांचा समावेश आहे. प्रगती माध्यमिक विद्यालय दासगांव ८४.६१, फलेदार हायस्कूल वहूर ९३.३३, न्यू इंग्लिश स्कूल दाभोळ ९४.९७, परांजपे विद्यामंदिर, महाड ९४.४०, पा.म. थरवळ कन्या विद्यालय महाड ९५.७५, दगडूशेठ पार्टे इंग्लिश मिडियम स्कूल महाड ९२.०४, अनंत महाराज माध्यमिक विद्यालय नाते ९६.३३, न्यू इंग्लिश स्कूल विन्हेरे ९२.८५, न्यू इंग्लिश स्कूल नागाव ९४.२८, जिजामाता माध्यमिक विद्यालय कोंझर ९६.४२, सैनिक विकास माध्यमिक विद्यालय फौजी आंबवडे ९०.४७, कोकण एज्यु. सोसायटी माध्यमिक विद्यालय मांडले ७९.०६, जाधवराव इंग्लिश मिडियम स्कूल लाडवली ८७, इस्लाम उर्दू हायस्कूल ९३.४५, आदर्श विद्यालय महाड ७९.४१, समर्थ रामदास विद्यालय, ग.द. आंबेकर माध्यमिक विद्यालय बिरवाडी ८९.८४, श्री छत्रपती विद्यालय वरंध ९१.४, न्यू इंग्लिश स्कूल वाळण ९८.५७, श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय वाकी ८०.९५, न्यू इंग्लिश स्कूल रावढळ ९१.६६, न्यू इंग्लिश स्कूल वलंग ८८.६३, उर्दू हायस्कूल राजेवाडी ९६.२९, उर्दू हायस्कूल चांढवे बुदु्रक ९५.२३, भेलाशी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय भेलोशी ९०.१४, कै. तात्यासाहेब नातू माध्यमिक विद्यालय, कुर्ले ९६.२९, आदर्श विद्यालय महाड ९६.२९, न्यू इंग्लिश स्कूल चांढवे ९६.६१, न्यू इंग्लिश स्कूल महाड ९६.४२, अल अमिन हायस्कूल, जीते ६६.६६, माध्यमिक विद्यालय वहूर ९४.४४, कै. शंकरराव बाबाजी सावंत माध्यमिक विद्यालय शिरगाव ९५.८९, उड्रे इंग्लिश मिडियम स्कूल, हिरे विद्यालय, तळोशी ५६.२५. (वार्ताहर)
महाड तालुक्यात ग्रामीण विद्यार्थी ठरले अव्वल
By admin | Published: June 08, 2015 11:08 PM