ग्रामपंचायतींचा शेकापला हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:10 PM2019-02-25T23:10:15+5:302019-02-25T23:10:20+5:30

रायगडमधील ९० ग्रामपंचायतींचा निकाल; १३ ग्रामपंचायतीवर शेकाप तर आघाडीकडे १२ ग्रामपंचायती; शेकापच्या ताब्यातील आठ ग्रामपंचायती आघाडीने घेतल्या

Grampanchayat election shekap lost | ग्रामपंचायतींचा शेकापला हादरा

ग्रामपंचायतींचा शेकापला हादरा

Next

मुरुड : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका संपन्न झाल्या, त्यापैकी दोन ग्रामपंचायतींवर आघाडीचे वर्चस्व राहिले तर एका ग्रामपंचायतीवर मजगाव विकास आघाडीला सत्ता मिळाली आहे. सोमवारी मुरु ड तहसील कार्यालयात सकाळी १0 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.


मजगाव ग्रामपंचायतीवर मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सत्ता खेचण्यात मजगाव विकास आघाडीला यश मिळाले आहे. मजगाव ग्रामपंचायतीत काँग्रेस आय पक्षाला समाधानकारक जागा न दिल्यामुळे त्यांनी शिवसेनेशी युती केली होती.


मजगावमध्ये थेट सरपंचपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा गोयजी तर मजगाव विकास आघाडीच्या पवित्रा चोगले यांच्यात लढत झाली. त्यांनी १३५ मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. तर विकास आघाडीचे अमित बुल्लू, अनिशा भंडारी, निविता सुर्वे, प्रीतम पाटील, रेश्मा पाटील, विनया जमनू असे सहा उमेदवार निवडून आले. तर प्रभाग २ मधून अतिश आयरकर व प्रणिता कमाने हे विजयी झाले. प्रभाग ४ मधून योगेंद्र गोयजी, एजाज सुभेदार निवडून आले.


उसरोली ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदासाठी भाजपाचे उमेदवार समीर शिंदे, तर आघाडीचे उमेदवार मनीष नांदगावकर यांच्यात लढत होऊन सुमारे ७३४ मतांनी भाजपा उमेदवार येथे पराजित झाले आहेत. अपक्ष म्हणून राहिलेले बबन शिंदे यांना २३१ मते मिळाली आहेत. येथे सुद्धा तीन पक्ष मिळून आघाडी निर्माण करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाचे येथे एकमेव उमेदवार संकेश पाटील हे केवळ एक मताने जिंकले आहेत. येथे भाजपाला या निमित्ताने एक ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहे.


येथे प्रभाग १ मधून नवनाथ तांबोळी, निकिता कार्लेकर, समीना घलटे, प्रभाग २ मधून कल्पना म्हशीलकर,वृषाली नवघरकर, प्रभाग ३ मधून संकेश पाटील, संजना मोरे प्रभाग ४ मधून शैलेश पाटील, शाईनज नाखवाजी, प्रभाग५ मधून महेश नाना पाटील, संगीता मुंबईकर हे निवडून आले आहेत.तर बिनविरोध सदस्य म्हणून मंगल वाघमारे,व राजेंद्र बाजी निवडून आलेले आहेत.

कावीरच्या चाव्या २५ वर्षांनी शेकापकडे
च्कावीर ग्रामपंचायत ही गेली २५ वर्षे काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती, मात्र मतदारांनी काँग्रेसला सत्तेतून खाली खेचत शेकापवर विश्वास ठेवत त्यांना सत्तेच्या चाव्या बहाल केल्या. शेकापचे राजेंद्र म्हात्रे यांनी सलग २० वर्षे निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या सुरेश म्हात्रे यांचा पराभव केला. शेकापचे राजेंद्र म्हात्रे हे सलग २५ वर्षे निवडणुकीत नशीब आजमावत होते. मात्र सातत्याने नशिबाने त्यांना हुलकावणी दिली होती. आता ते थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याने नशिबाने त्यांच्या बाजूने कौल दिला आहे.

आगरसुरेत शेकापची १० वर्षांची राजवट संपुष्टात
च्आगरसुरे ग्रामपंचायतीमध्ये गेली १० वर्षे शेकापची राजवट होती. या ठिकाणी काँग्रेसचा सरपंच निवडून आणल्याने शेकापचे राज्य खालसा झाले आहे. काँग्रेसच्या जागृती पेढवी या थेट सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष
के ला.

शेकापने आठ ग्रामपंचायती गमावल्या
च्आगरसुरे, चिंचोटी, कुर्डूस, कुसूंबळे, ढवर, बामणगाव, कुरकोंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीवर काँग्रेस (आघाडीने) वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्याचप्रमाणे ताडवागळे ग्रामपंचायतीवरही शेकापचे वर्चस्व होते. या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराने शेकापच्या उमेदवाराचा फक्त एका मताने पराभव केला आहे.

थळ ग्रामपंचायत शिवसेनेने राखली
च्थळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने शेकापसह राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच धूळ चारली. सरपंचपदी सुनील पत्रे हे निवडून आले, तर तब्बल १६ सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत. शेकापला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहेत.

पेणमध्ये सरपंच निवडणुकीत शेकापचीच बाजी
१पेण : पेणमधील उंबर्डे, शिहू, कांदळे ग्रामपंचायतीमध्ये शेकापच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी धोबीपछाड देत शेकापचा लाल बावटा फडकविला तर वढाव ग्रामपंचायतीवर भाजपप्रणीत परिवर्तन आघाडीच्या सरपंच पूजा पाटील यांनी बाजी मारीत प्रचंड मतांनी आघाडी घेत विजय मिळवित भाजपाने खाते उघडले. तर शिर्की ग्रामपंचायतीमध्ये पाणीटंचाईविरोधात आक्रमक असलेली ग्रामविकास चळवळीच्या धनश्री पाटील यांनी विजय संपादन करीत मतदारांची सहानुभूती मिळवत विजयाचे तोरण बांधले. एकू ण निकाल पाहता या ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापनेच बाजी मारली.
२शिहू ग्रामपंचायतीवर शेकापने विजय संपादन के ला. सरपंच पदावर पल्लवी भोईर यांच्यासह ८ सदस्य निवडून आले. उंबर्डेत शेकापचे महेश पाटील तर कांदळे येथे शेकापचे मुरलीधर भोईर यांनी विजय मिळविला. वढावमध्ये भाजपच्या पूजा पाटील यांनी विजय मिळवला. शिर्की ग्रामपंचायतीवर ग्रामविकास चळवळीने बाजी मारत धनश्री पाटील सरपंचपदावर निवडून आल्या.

अंबोली ग्रामपंचायतीवर विकास आघाडीचा झेंडा
च्आगरदांडा : मुरुड तालुक्यातील अंबोली ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे शिवसेनेचे वर्चस्व होते. या निवडणुकीत अंबोली विकास आघाडीने बाजी मारली.
च्मुरुड तालुक्यातील अंबोली ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांकरिता व थेट सरपंचपदाकरिता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. सरपंचपदाकरिता शिवसेनेकडून कोमल माळी व अंबोली विकास आघाडीकडून शिल्पा मोकल रिंगणात उभ्या होत्या. या निवडणुकीत शिल्पा मोकल १९ मतांनी विजयी झाल्या.
च्प्र. १ मधून गणेश म्हात्रे (शिवसेना), गणेश गोसावी (शिवसेना), वर्षा खंडागळे (शिवसेना), प्र क्र .२ मधून मुसद्दीक अब्दुलसलाम तलवसकर बिनविरोध (राष्ट्रवादी काँग्रेस), मिनाज मुजफ्फर कलबसकर (राष्ट्रवादी ), गुलाब बैकर (शिवसेना), प्रभाग क्र मांक ३ मधून आदेश भोईर (राष्ट्रवादी काँग्रेस), दुर्गा विठ्ठल गुंड (राष्ट्रवादी काँग्रेस), नूतन धर्मा चव्हाण (शेकाप) मधून उमेदवार निवडून आले.

सारळ ग्रा.पं.वर वर्चस्व ठेवण्यात काँग्रेसला यश
च्सारळ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा होता. त्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून परावृत्त करण्यासाठी शेकापने चांगलीच कंबर कसली होती. मात्र काँग्रेसने शेकापची डाळ शिजू दिली नाही. काँग्रेसच्या अमृता नाईक या सरपंचपदी तर, सहा सदस्य काँग्रेसचे निवडून आले. शेकापचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत.

चौल ग्रा.पं. राखण्यात शिवसेना यशस्वी
च्चौल ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी येथे धुमधडाक्यात प्रचार केला होता. बाइक रॅलीवरून उमेदवारांना निवडून देण्याची विनंती दोन्ही नेत्यांनी केली होती. प्रतिभा पवार यांनी सरपंच पदावर आपले नाव कोरले. शिवसेनेचे १६ सदस्य निवडून आले, तर शेकापला येथे एकाच उमेदवाराला निवडून आणता आले आहे.

Web Title: Grampanchayat election shekap lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.