शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

ग्रामसेविकेने केला चार लाखांचा अपहार

By admin | Published: September 09, 2015 11:00 PM

दादली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविके ने सरपंचाच्या बनावट सह्या करून बँकांमधील सुमारे चार लाख रुपयांची रक्कम काढून अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

महाड : दादली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविके ने सरपंचाच्या बनावट सह्या करून बँकांमधील सुमारे चार लाख रुपयांची रक्कम काढून अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मेघना भोसले असे या अपहार करणाऱ्या ग्रामसेविके चे नाव असून ती फरारी आहे. या प्रकरणी सरपंच सुवर्णा लाले यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या ग्रामसेविकेच्या विरोधात वारंवार तक्रारी करूनही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी गावकीच्या सभेत केला. ग्रामसेविका भोसले यांना १८ आॅगस्टला जिल्हा परिषदेने निलंबित केल्यानंतर स्वत:च्या ताब्यातील धनादेशावर सरपंचाच्या बनावट सह्या करून बँकामधील या रकमा काढल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. दादली ग्रामपंचायतीची बचत खाती रायगड जि.म.सह. बँक आणि बडोदा बँकेच्या महाड शाखेत असून या खात्यामध्ये आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार सरपंच आणि ग्रामसेवकांना संयुक्त होते. ग्रामसेविका भोसले गेल्या वर्षभरापासून या ग्रामपंचायतीत कार्यरत असून तिच्या कार्यपद्धतीवर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ नाराज होते. बँकेच्या खातेपुस्तकांची वेळोवेळी मागणी करूनही सरपंचांनाही ती जुमानत नव्हती. या ग्रामसेविकेच्या विरोधात सरपंचांनी पंचायत समितीकडे तक्रारी करुन कारवाई करावी अशी मागणी केली होती.वर्षभरानंतर ग्रामसेविका मेघना भोसलेला १६ आॅगस्टला निलंबित केले.ग्रामसेविकेला निलंबित केल्याबाबतची कोणतीही माहिती पंचायत समितीने दादली ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली नाही. असे असतानाही या ग्रामसेविकेने २२ आॅगस्टला बेकायदा ग्रामसभा बोलावली होती. निलंबित ग्रामसेविका मेघना भोसले यांनी केलेल्या गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, अशा प्रकारच्या गैरव्यवहार करणाऱ्यांना पंचायत समिती व्यवस्थापन पाठीशी घालणार नाही.-संघरत्ना खिलारे, गटविकास अधिकारी, महाड