धक्कादायक! नातवानेच केली आजीची हत्या; रोहा पोलिसांनी २४ तासांत लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 10:15 AM2023-10-09T10:15:01+5:302023-10-09T10:15:30+5:30

शांताराम पांडुरंग जाधव (वय २४) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत अंकुश रामा वाघमारे यांनी फिर्याद दिली होती.

Grandson kills grandmother Roha police investigate in just 24 hours | धक्कादायक! नातवानेच केली आजीची हत्या; रोहा पोलिसांनी २४ तासांत लावला छडा

धक्कादायक! नातवानेच केली आजीची हत्या; रोहा पोलिसांनी २४ तासांत लावला छडा

googlenewsNext

रोहा : मालमत्तेच्या हव्यासापोटी नातवानेच धामणसई आदिवासी वाडीवरील लक्ष्मी रामा वाघमारे (वय ६०) या आपल्या आजीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. रोहा पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत २४ तासांत आरोपीला गजाआड केले. शांताराम पांडुरंग जाधव (वय २४) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत अंकुश रामा वाघमारे यांनी फिर्याद दिली होती.

मालमत्तेच्या हव्यासापोटी आरोपीने लक्ष्मी वाघमारे यांचा दगडाने ठेचून खून केला होता. घटनास्थळी प्रथमदर्शनी कुठलाही पुरावा नसताना कौशल्यपूर्ण तपास करीत पोलिसांनी आरोपीला २४ तासांत अटक केली. अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे आणि पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी खुनाच्या तपासासाठी पोलिसांची ५ तपास पथके तैनात केली होती. कोलाड रेल्वे गेटवरील कर्मचाऱ्याच्या खुनाचा तपास लावण्यात यशस्वी ठरलेले रोहा पोलिस प्रशासन धामणसई येथील खुनाचा २४ तासांतच तपास लावण्यात यशस्वी ठरल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
 

Web Title: Grandson kills grandmother Roha police investigate in just 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.