स्त्रीशक्ती गौरव : वाहक म्हणून अर्चनाची तपपूर्ती , सरकारी निर्णयाचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 02:02 AM2017-09-24T02:02:44+5:302017-09-24T02:02:48+5:30

राज्य सरकारने १२ वर्षांपूर्वी एसटी बसमध्ये महिला वाहकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आणि महिलांकरिता एका नव्या क्षेत्राची कवाडे खुली झाली.

Gratitude Gradation: The applicability of the government decision, the applicability of Archana as the carrier | स्त्रीशक्ती गौरव : वाहक म्हणून अर्चनाची तपपूर्ती , सरकारी निर्णयाचा फायदा

स्त्रीशक्ती गौरव : वाहक म्हणून अर्चनाची तपपूर्ती , सरकारी निर्णयाचा फायदा

googlenewsNext

- जयंत धुळप ।

अलिबाग : राज्य सरकारने १२ वर्षांपूर्वी एसटी बसमध्ये महिला वाहकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आणि महिलांकरिता एका नव्या क्षेत्राची कवाडे खुली झाली. हा निर्णयाचा फायदा घेऊन अर्चना शशांक अबू यांनी यांनी ‘महिला एसटी वाहकाची चाचणीची परीक्षा दिली. आणि गेल्या १२ वर्षांपासून त्या राज्य परिवहन मंडळाच्या सेवेत कार्यरत आहेत.
काम करताना प्रवासादरम्यान अनेकदा समस्या येतात; पण स्वीकारलेल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे, अशी त्यांची जिद्द होती. १२ वर्षांत प्रथमच पुरस्काराची मानकरी ठरल्याने ‘लोकमत स्त्रीशक्ती गौरव पुरस्कारा’चे स्थान आनंदाचे आणि अनन्य साधारण असेच आहे, अशी भावना रायगड एसटी विभागातील पहिल्या महिलावाहक अर्चना शशांक अबू यांनी व्यक्त केली आहे.

महिलांचा उत्साह द्विगुणित करणारा
शनिवारी नवरात्रोत्सवाच्या तिसºया दिवशी पहिल्या महिलावाहक अर्चना अबू यांना त्यांच्या अलिबाग एसटी आगारातील कार्यस्थळीच ‘लोकमत-स्त्रीशक्ती गौरव पुरस्कार’ अलिबाग मधील ज्येष्ठ रेडिआॅलॉजिस्ट आणि निदान डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालिका डॉ. अनीता संजीव शेटकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शेटकार म्हणाल्या, महिला आता कोणत्याही क्षेत्रात कार्यरत होण्याकरीता सिद्ध आहेत. एसटीवाहक हे क्षेत्र त्या काळात एक आव्हानात्मत क्षेत्र होते; परंतु त्यातही महिला यशस्वी झाल्याचे पहिल्या महिला एसटीवाहक अर्चना अबू यांच्यानिमित्ताने अनुभवण्यास मिळाले. ‘लोकमत’चा उपक्रम खरेच महिलांना शाबासकी देऊन, उत्साह द्विगुणित करणारा आहे, असे त्यांनी नमूद केले. या वेळी सहायक वाहतूक अधीक्षक रेश्मा गाडेकर, वाहक अस्मिता वैभव राऊत, वाहक दीप्ती धुमाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Gratitude Gradation: The applicability of the government decision, the applicability of Archana as the carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.