शहीद लक्ष्मण निकम यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:21 AM2017-08-16T01:21:43+5:302017-08-16T01:21:46+5:30

पोलादपूर तालुक्यातील कोंढवी येथे भारतीय सीमेवर कारगिल युद्धात शहीद झालेले लक्ष्मण निकम यांच्या पुतळ्यास मंगळवारी स्वातंत्र्यदिनी सामुदायिक अभिवादन करण्यात आले.

Greetings to Shaheed Lakshman Nikam | शहीद लक्ष्मण निकम यांना अभिवादन

शहीद लक्ष्मण निकम यांना अभिवादन

googlenewsNext

अलिबाग : पोलादपूर तालुक्यातील कोंढवी येथे भारतीय सीमेवर कारगिल युद्धात शहीद झालेले लक्ष्मण निकम यांच्या पुतळ्यास मंगळवारी स्वातंत्र्यदिनी सामुदायिक अभिवादन करण्यात आले. शहीद लक्ष्मण निकम यांच्या अर्धपुतळ्यास कॅप्टन एस. आर. निकम यांनी माजी सैनिकांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलादपूर तालुक्यातील कोंढवीमध्ये लक्ष्मण निकम यांचा जन्म २ मार्च १९६५ रोजी झाला. त्या वेळी कोंढवी परिसरात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने शिक्षणासाठी पळचिल किंवा पोलादपूरला यावे लागत असे. कोंढवीमध्ये अनेक तरु ण सैन्यात भरती झाले होते. मात्र, काही वर्षे ही परंपरा खंडित झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर लक्ष्मण निकम भारतीय सैन्यात भरती झाले. चंदीगढ, पंजाब, काश्मीर या प्रांतांमध्ये लक्ष्मण निकम, नाईक सुभेदार पदापर्यंत पोहोचले. यादरम्यान लग्न होऊन पत्नीला घेऊन ते पंजाब येथे गेले होते. नाईक सुभेदार लक्ष्मण निकम यांना कारगिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी आक्र मणा वेळी पाठविण्यात आले होते. त्यामुळे पत्नी संगीता यांना त्यांनी पुन्हा कोंढवी येथे पाठविले होते. त्यानंतर केवळ चार-सहा महिन्यांतच २७ जुलै १९९८ रोजी लक्ष्मण निकम शहीद झाल्याचे वृत्त त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले, अशी माहिती या वेळी कॅप्टन एस. आर. निकम यांनी दिली.
शहीद लक्ष्मण निकम यांच्या वीरपत्नी संगीता यांना सरकारकडून कारगिल शहीद योजनेंतर्गत भूखंड मिळणे अपेक्षित होते. मात्र, शासकीय लालफितीच्या कारभारामुळे तो पाच वर्षे झाली तरी मिळत नव्हता. अखेर ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याअंती रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी होनाजी जावळे यांनी स्वत: स्वातंत्र्यदिनीच पोलादपूर येथे पोहोचून, तत्कालीन महाड उपविभागीय महसूल अधिकारी रवींद्र हजारे, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, महाड मॅन्युफॅक्टरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विनोद देशमुख यांच्या उपस्थितीत वीरपत्नी संगीता निकम यांना भूखंडाचा सात-बारा उतारा प्रदान करून, भूखंड त्यांच्या नावे करून दिला होता. या वेळी कोंढवी ग्रामपंचायत आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अनंत माने यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले.
>म्हसळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात
म्हसळा : भारतीय स्वातंत्र्याचा ७० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात म्हसळा तालुक्यात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र दिनानिमित्त म्हसळा पंचायत समिती येथील ध्वजारोहण सभापती उज्ज्वला सावंत यांच्या हस्ते, नगरपंचायतीचे ध्वजारोहण नगराध्यक्षा कविता बोरकर, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे ध्वजारोहण फजल हालडे यांनी केले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण
कार्यक्र म कन्याशाळेच्या भव्य प्रांगणात तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्र मात शहरातील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. विविध सांस्कृ तिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

Web Title: Greetings to Shaheed Lakshman Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.