कर्जत : तालुक्यातील प्रतिमाथेरान समजले जाणाºया दुर्गम भागातील ढाक बिहरी भागात मुंबई भागातील आठ तरुण ट्रेकिंगसाठी आले होते. चालताना एकास आकडी आल्याने प्रकृती अस्वास्थ्यामुळे आठ तरुण अडकले होते. मात्र, पोलिसांच्या मदतीने चार तरु ण रविवारी मध्यरात्री २ वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले.रविवारी सकाळी तीन तास डोंगर चढून पोहोचलेले तरु ण सायंकाळी ४च्या सुमारास दोन गटात ढाक गावातून खाली पायथ्याशी यायला निघाले. चार तरु णांचा एक गट ६.३० वाजता पायथ्याशी पोहोचला. त्यांनी सकाळी ठरवून घेतलेली रिक्षा पुन्हा कर्जत स्टेशनपर्यंत नेण्यासाठी पोहोचली होती. काळोख झाला तरी अन्य चार तरु ण येत नसल्याने मागाहून येत असलेल्या तरु णांना फोन केला. त्या वेळी त्यातील केतन मारु ती पाटील (१९), या तरु णाला आकडी आल्याने ते ढाक गावाच्या बाहेरच थांबून राहिले होते. रिक्षावाल्याने स्थानिक ग्रामस्थांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला, तर खाली पायथ्याशी पोहोचलेल्या तरु णांनी १०० क्र मांक फिरवून पोलिसांना आपले सहकारी ढाक येथील डोंगरावर राहिले असल्याची माहिती दिली. मात्र, त्यांनी केलेला फोन हा सातारा जिल्हा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला लागला. सातारा येथून अलिबाग येथे रायगड पोलिसांना त्याबाबत बिनतारी संदेश देण्यात आला.अखेर कर्जत पोलिसांना ही माहिती मिळताच, रात्री १०च्या सुमारास पोलीस वदप येथे ढाक गावाच्या पायथ्याशी पोहोचले.सध्या चंद्राचा मोठा प्रकाश असल्याने पोलीस उपनिरीक्षक आदगले, सहायक उपनिरीक्षक पारधी, मुसळे, पोलीस शिपाई सलगरे यांनी स्थानिक तरु ण अरु ण वाकचोरे, विश्वास काळे यांना सोबत घेऊन रात्री ढाकचा डोंगर चढण्यास सुरु वात केली. तेथे मध्यरात्री १२च्या सुमारास पोहोचून पोलिसांनी आकडी आलेला तरु ण केतन पाटील, हृषीकेश पाटील (२०), पुलकेशी गायकवाड (१८), अथर्व इंगळे (१८) यांना खाली आणले. आकडी आलेला ट्रेकर्स केतन पाटील हादेखील त्यांच्यासोबत चालतच डोंगर उतरून रविवारी मध्यरात्री २ वाजता पायथ्याशी पोहोचला.त्या ठिकाणी ट्रेकर्सचे नातेवाईक दीपक पाटील हे मुंबईवरून आले होते. त्यांच्या ताब्यात केतन पाटीलला सोपवून कर्जत पोलिसांनी मागील दहा दिवसांतील ट्रेकिंगसाठी आलेल्या दुसºया एका गटाला त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात यश मिळविले.
तरु णांचा गट पोलिसांच्या मदतीने सुखरूप परतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 7:01 AM