विश्रामगृहातील खोल्या वाढवा
By admin | Published: April 18, 2016 12:35 AM2016-04-18T00:35:25+5:302016-04-18T00:35:25+5:30
मुरु ड तालुका हा पर्यटन तालुका असूनसुद्धा येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे एकच विश्रामगृह उपलब्ध आहे. या विश्रामगृहात एक व्हीआयपी कक्ष तर दोन साधे कक्ष उपलब्ध आहेत.
मुरुड (नांदगाव) : मुरु ड तालुका हा पर्यटन तालुका असूनसुद्धा येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे एकच विश्रामगृह उपलब्ध आहे. या विश्रामगृहात एक व्हीआयपी कक्ष तर दोन साधे कक्ष उपलब्ध आहेत. तर येणारे पर्यटक व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची संख्या वर्षाला तीन लाखपेक्षा जास्त असल्याने या विश्रामगृहाचा त्यांना पाहिजे तसा उपयोग होत नाही. या विश्रामगृहातील खोल्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या विश्रामगृहातील पहिल्या मजल्यावर मागील दोन वर्षापूर्वी काम करण्यात येऊन व्हीआयपी व साधे कक्ष निर्माण करण्यात आले होते. परंतु यावर पैसा खर्च होऊन सुद्धा रूम अद्यापपर्यंत पर्यटकांना उपलब्ध झालेल्या नाहीत. रूम तयार आहेत परंतु आतील लागणाऱ्या समानासाठी पैसा उपलब्ध होत नसल्याने या रूम तशाच ठेवण्यात आल्या आहेत. दोन वर्षे झाली तरी सार्वजनिक बांधकाम खाते या रूम पर्यटकांना उपलब्ध करून देत नसल्याने नाराजी व्यक्त के ली आहे.हा पैसा ज्या बांधकामावर खर्च झाला, तो नक्की कशासाठी वापरला याची चौकशी कार्यकारी अभियंता महाड यांचामार्फत व्हावी अशी मागणी होत आहे. रूम उपलब्ध होत नसल्याने जास्त वाजवी दराने अधिकारी वर्गाला खासगी लॉजसाठी खर्च करावे लागत आहेत. पैसे खर्च करून सुद्धा रूम तयार होत नसतील तर मग शासनाचा पैसा खर्च होऊन उपयोग काय? याबाबत चौकशी करून पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
पर्यटक नाराज
शाळेला सुट्या लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटनासाठी मुरूडमध्ये येत आहेत. अनेक जण हॉटेल महागडे असल्याने शासकीय विश्रामगृहाला पसंती देत आहेत. मात्र येथे रूम उपलब्ध होत नसल्याने जास्त वाजवी दराने अधिकारी वर्गाला खासगी लॉजसाठी खर्च करावे लागत आहेत. यामुळे पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. पर्यटक विश्रामगृहामध्ये खोल्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करीत आहेत.