जिल्ह्यात बेदरकार चालकांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:46 AM2019-03-10T00:46:53+5:302019-03-10T00:47:23+5:30

जिल्ह्यात बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या घटना वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

Growth drivers in the district increased | जिल्ह्यात बेदरकार चालकांमध्ये वाढ

जिल्ह्यात बेदरकार चालकांमध्ये वाढ

Next

- जयंत धुळप 

अलिबाग : विनापरवाना वाहन चालविणे धोकादायक आहे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, बेदरकार वाहन चालवू नये, आपल्या पाल्याकडे परवाना नसताना त्याला दुचाकी घेऊन देऊ नये आदी नियमांबाबत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या घटना वाढतच असल्याचे दिसून येत आहे.
जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांनी बेफिकिरीने वाहन चालविणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे या कारणास्तव विविध प्रकारचे तब्बल १२ हजार ७४६ गुन्हे दाखल केले आहेत. आणि या चालकांकडून एकूण ३० लाख ९९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्याची कारवाई केल्याची माहिती रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्यास त्याचे परिणाम त्याच्या भवितव्यावर होतात. उच्चशिक्षणाकरिता परदेशी जायचे असले तर पासपोर्ट आवश्यक असतो. पासपोर्टकरिता पोलीस चौकशी अहवाल लागतो. या चौकशी अहवालात विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल असल्याची नोंद आल्यास त्यास पासपोर्ट नाकारला जातो. याबाबत वाहतूक पोलीस बेदरकार चालक तसेच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सातत्याने समजावून सांगत असतात. मात्र, त्याकडे विद्यार्थी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. पालकांनीही मुलांना परवान्याशिवाय वाहने चालविण्यास देऊ नये. अनेकदा त्यांच्याकडून वाहतून नियमांची पायमल्ली होत असल्याचे सांगितले.

पालकांवर दंडात्मक कारवाई
विनापरवाना, विनाहेल्मेट, ट्रिपलसीट, वेगात दुचाकी चालविताना दोनपेक्षा अधिक वेळेस तोच विद्यार्थी वा युवक वाहतूक पोलिसांना सापडल्यास त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या पाल्याच्या गुन्ह्याबाबतची कल्पना देण्याचाही प्रयोग संवेदनशीलतेने वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात केला. त्यात काही पालकांनी आपल्या पाल्याची चूक मान्य करून पुन्हा असा गुन्हा त्यांच्याकडून घडणार नाही अशी हमी दिली, तर काही पालक पाल्याचे समर्थन करीत असल्यानेही अपघातांत वाढ होत आहे.

पालकांवर दंडात्मक कारवाई
दुचाकी वाहनांच्या जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांमध्ये जखमी आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये अल्पवयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे अपघात होऊ नयेत, याकरिता विशेष मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अनेकदा सांगूनही बेदरकार, विनापरवाना दुचाकी चालविणाºया १६५ युवकांच्या पालकांवर गुन्हे दाखल केले असता, न्यायालयाने पालकांवर दंडात्मक कारवाई केली असल्याचे वराडे यांनी सांगितले.

2 महिन्यांत १२ हजार ७४६ गुन्हे
165 विद्यार्थ्यांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई
रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून वाहन अपघात थांबविण्याचे विविध उपक्रम

Web Title: Growth drivers in the district increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.