पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 03:45 AM2018-05-02T03:45:57+5:302018-05-02T03:45:57+5:30

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८व्या वर्धापनदिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर उत्साहात पार पडला.

Guardian Minister Ravindra Chavan inaugurated the flag | पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

googlenewsNext

अलिबाग : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८व्या वर्धापनदिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर उत्साहात पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे, तसेच स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री यांनी ध्वजारोहणानंतर परेडचे निरीक्षण केले. या वेळी पोलीस दल व अन्य दलांनी मानवंदना दिली. परेड कमांडंट भास्कर महादेव शेंडे यांच्या नेतृत्वात झालेल्या शानदार संचलनात पोलीस दल, होमगार्ड, वज्र पथक, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, श्वान पथक, बॉम्ब शोध व नाश पथकांनी सहभाग नोंदवला. पोलीस बॅण्डच्या सुरावर तालबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. सोहळ्यास स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, शासकीय अधिकारी-कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते. या वेळी सूत्रसंचालन किरण करंदीकर यांनी केले.

Web Title: Guardian Minister Ravindra Chavan inaugurated the flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.