खड्डे बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:34 AM2018-08-26T03:34:19+5:302018-08-26T03:35:20+5:30

मुुंबई-गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च

Guardian Minister Ravindra Chavan is responsible for the upkeep of the potholes | खड्डे बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

खड्डे बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

Next

अलिबाग : गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम ज्या कंत्राटदारांना दिले आहे, त्यांच्यावरच गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी असते, तसे सरकारने कंत्राटदाराबरोबर केलेल्या करारात नमूदही असते. त्याकरिता पालकमंत्री या नात्याने आपणही पाठपुरावा करत असल्याचे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

शुक्रवारी केंद्रीय दळवळणमंत्री नितीन गडकरी यांना गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चार किलोमीटरचे अंतर कापायला अर्धा तास लागला. त्यावर, मंत्री म्हणून मला या रस्त्याची लाज वाटते, अशी उद्विग्न भावना व्यक्त केली. महामार्गाची दुरवस्था आणि त्यास जबाबदार यंत्रणांची निष्क्रीयता पुन्हा चर्चेत आली आहे.

खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केल्याचा दावा

गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम आमचे नाही. तरी गेल्या चार-पाच वर्षांत विशेषत: गणेशोत्सवाच्या वेळी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून सांगितल्यावर खड्डे बुजवण्याचे काम केवळ सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून केले आहे.

खड्डे बुजवण्याच्या कामावर गेल्या चार-पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत; परंतु त्या कामाचे स्वतंत्र बिल मिळणार की नाही, या बाबत शासनाकडून स्पष्टता नाही, अशी भूमिका नाव जाहीर न करण्याच्या अटीवर गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली आहे.

दोन वर्षांत ३७ समजपत्रे
च्गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट ज्या कंत्राटदारास देण्यात आले आहे, त्यानेच सद्यस्थितीतील गोवा महामार्गाची सुरक्षितता अबाधित राखण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करणे व धोकाविरहित ठेवणे हे त्यांच्या कंत्राट करारनाम्यातच नमूद आहे. त्याच आधारावर २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांत या कंत्राटदारांना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने एकूण ३७ लेखी पत्रान्वये समज दिल्याची माहिती रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बाबत न्यायालयीन लढाई लढत असलेले सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अजय उपाध्ये यांनी दिली आहे.
गोवा राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी प्रवास करणार म्हणून कंत्राटदारांनी गुरुवारपासून वडखळ ते पेण दरम्यान खड्डे बुजवले.

Web Title: Guardian Minister Ravindra Chavan is responsible for the upkeep of the potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.