पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची जिल्हा रुग्णालयास अचानक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 03:11 PM2019-05-14T15:11:15+5:302019-05-14T15:11:23+5:30
व्यवस्था सुधारण्याचे सक्त आदेश
अलिबाग : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या विविध समस्यांच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी सकाळी 10 वाजता रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक या जिल्हा रुणालयात दाखल झाले आणि रुग्णालयात डॉक्टर, परिचारीका व कर्मचारी यांची एकच दाणादाण उडाली.
केसपेपर काढण्यासाठी रुग्णांची मोठी रांग तर डॉक्टर गैरहजर असे वास्तव त्यांना अनुभवास आले. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकुर, रायगड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अॅड. महेष मोहिते, अॅड.अंकीत बंगेरा आदि उपस्थित होते.
रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल फुटाणे यांना त्यांनी व्यवस्था बदलाबाबतचे आदेश दिले. दरम्यान डायलेसिस युनिटच्या कामाबाबत समाधान व्यक्त करुन; आवश्यक त्यासुविधा देण्याकरिता युनीटच्या प्रमुख डॉ. दिपाली देशमुख यांना आश्वासित केले.