अंबा नदीतील रेती उत्खननाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:01 AM2018-04-09T03:01:49+5:302018-04-09T03:01:49+5:30

पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेण तालुक्यातील गावांलगतच्या अंबा नदीत प्रचंड प्रमाणात रेती उत्खनन केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

The Gulf of Amba River exploded | अंबा नदीतील रेती उत्खननाचा फटका

अंबा नदीतील रेती उत्खननाचा फटका

Next

राजेश भिसे 
नागोठणे : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेण तालुक्यातील गावांलगतच्या अंबा नदीत प्रचंड प्रमाणात रेती उत्खनन केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. नदीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गावांतील पश्चिम बाजूकडील शेती या अनधिकृत वाळू उपशामुळे जवळपास उद्ध्वस्त झाली असताना पूर्व बाजूकडील गावांमधील शेती सुद्धा या उपशामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने पेण तहसील कार्यालयाचे याकडे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागोठणे विभागात पेण तालुक्यातर्गत असणाºया अंबा नदीच्या किनाºयालगत नदीच्या पश्चिम बाजूला तरशेत, जांभूळटेप, शिहू, आटिवली, तर पूर्व बाजूला कोलेटी, कोलेटीवाडी, तळेखार आदी गावे आहेत. गेली अनेक वर्षे या ठिकाणाहून रेतीचा प्रचंड उपसा काढला जात असल्याने खाडीलगतच्या खारबंधिस्तीला खांडी पडून खारे पाणी शेतात घुसल्याने पश्चिम बाजूकडील शेती जवळपास नापिकी झाली आहे. पूर्वीपासून हातपाटीद्वारे रेतीचा उपसा व्हायचा, मात्र कमी वेळात जादा रेती उपलब्ध म्हणून नदीत सक्शन पंप लावून रेतीचा उपसा केला जात असल्याचे संबंधित प्रतिनिधीने माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आढळून आले आहे. दिवसभरात ५0 ते ७५ ब्रास रेतीचे येथून उत्खनन होत असल्याने वाळू माफियांना या मालाचे दररोज साधारणत: १ लाखाचे उत्पन्न मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. नदीतून उपसा केलेली वाळू, ट्रॅक्टर तसेच मोठ्या अवजड वाहनांद्वारे इच्छित स्थळी पोहचवण्याची कामगिरी केली जात असल्याचे एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. शेतीचे नुकसान होत असतानाच नदीतून वाळू खेचणारा सक्शन पंप दिवसभर चालूच राहात असल्याने मासळीची विक्र ी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालविणाºया स्थानिक मच्छीमार बांधवांना किनारपट्टीला तसेच डोलींना मच्छीच लागत नसल्याने त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याचे सांगितले गेले. शासनाने वाळू उपशावर निर्बंध घातले असतानाही या ठिकाणी उघडउघड रेती उत्खनन केले जात असल्याने या वाळू माफियांवर नक्की कोणाचा वरदहस्त आहे, असा संतप्त सवाल केला जात आहे.

Web Title: The Gulf of Amba River exploded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.