श्रीवर्धनमध्ये पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:32 PM2019-08-03T23:32:21+5:302019-08-03T23:32:29+5:30

बोर्लीपंचतन शहराला जोडणारे मार्ग पाण्याखाली

The hail of rain in Srivardhan | श्रीवर्धनमध्ये पावसाचा कहर

श्रीवर्धनमध्ये पावसाचा कहर

Next

दिघी : श्रीवर्धन तालुक्यात वादळी पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार सुरुवात केल्याने बोर्लीपंचतन शहराला जोडणारे मार्ग पाण्याखाली गेले. याशिवाय रस्त्यालगत अनेक वृक्ष उन्मळून पडले. परिणामी लहान-मोठे रस्ते बंद झाल्याने परिसरातील चाळीस गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तालुक्यातील बोर्लीपंचतन परीसरात शुक्रवारी रात्री सोसाट्याचा वाऱ्याने पावसाची सुरुवात झाली. शनिवारी बोर्लीपंचतन शहराला जोडणारे अनेक मार्ग पाण्याखाली गेले. तर दिवेआगर गावामध्ये सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. यातील तालुक्याला जोडणारा श्रीवर्धन - बोर्लीपंचतन जिल्हा मार्गावर कार्ले गावाजवळ १ किलोमीटर अंतरावर नदीने पूररेषा ओलांडली. बोर्लीपंचतन येथून मुंबईकडे जाणाºया मुख्य मार्गावर वाकडे पुलानजीक नदीने धोक्याची पातळी ओलांडल. पूरसदृश्य परिस्थितीमुळे मुंबई, पुणे आणि माणगाव, महाड शहराकडे जाणाºया महामंडळच्या गाड्यांना बोर्लीपंचतन बसस्टॉपवर थांबावे लागले.

काही तास वाहतूक बंद
दिवेआगर, खुजारे, शिस्ते गावच्या रस्त्यालगत वृक्षांना वादळी वाºयाचा तडाखा बसल्याने वृक्ष रस्त्याच्या मध्यभागी कोसळले. वाहतूक काही काळ खोळंबली होती. ग्रामस्थ व वाहन चालकांच्या मदतीने झाड रस्त्यातून हटवण्यात आले.

शेतीचे नुकसान
संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याला समुद्रकिनाऱ्यांनी वेढले आहे. भरती व अतिवृष्टीमुळे खाडीलगत गावामध्ये उधाणाचे पाणी शिरून शिस्ते, मेंदडी, वारळ या गावांतील शेतकºयांचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसापूर्वी केलेली भात लावणी पावसात वाहून गेली आहे.

पाच दिवस वीजपुरवठा खंडित
जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली होती. श्रीवर्धन तालुक्यात आठवड्यात पडलेल्या वादळी पावसामुळे सातत्याने पाच दिवस वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title: The hail of rain in Srivardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस