शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा स्थगित; समस्यांबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई लवकर घेणार बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 12:04 AM

राज्य शासनाकडून दखल

पेण : रायगड जिल्ह्यातील पेण आणि खालापूर तालुक्यातील तब्बल २४८ शेतकऱ्यांनी रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनविरोधात पेण ते मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानापर्यंत विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न पायी मोर्चा काढण्याचा इशारा १५ दिवसांपूर्वी दिला होता. कालपर्यंत कोणतीही दखल राज्यस्तरावर घेण्यात न आल्याने मंगळवारी पेण प्रांत कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात होणार होती. मात्र, मोर्चा सुरू होण्यापूर्वीच याची दखल राज्य शासनाकडून घेतली गेली. यामुळे मोर्चेकऱ्यांनी आपला मोर्चा पेणमध्येच स्थगित करून लवकरच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे विष्णू पाटील यांनी सांगितले.

रिलायन्स गॅस कंपनीने येथील ५२९ बाधित शेतकऱ्यांपैकी ३८१ शेतकऱ्यांना साडेपाच ते सात लाखांपर्यंतचा मोबदला दिला. तर उर्वरित पेणमधील १४८ आणि खालापूरमधील १०० शेतकऱ्यांना ८० हजार रुपयांचा मोबदला देऊन शेतकºयांची फसवणूक केली असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी निवेदनातून केला आहे.

एवढेच नव्हे तर यातील १५ शेतकऱ्यांना तर कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता कंपनीने ही पाइपलाइन टाकली असल्याचा आरोपदेखील शेतकऱ्यांनी केला असून, जोपर्यंत आम्हाला आमचा योग्य तो मोबदला मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे शेतकºयांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांची दखल घेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी याबाबत चर्चा केली.

शेतकऱ्यांना आशा

लवकरच मंत्रालयस्तरावर या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता बैठक आयोजित करण्यात येणार आहे, त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती विष्णू पाटील यांनी दिली. तसेच लेखीपत्र पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आम्हा शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील, अशी आशा शेतकºयांना आहे.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी