दीडशे क्विंटल झेंडूची आवक; महाडमध्ये बाजारपेठेत गर्दी, पावसामुळे उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 05:48 AM2017-09-30T05:48:49+5:302017-09-30T05:49:01+5:30

विजयादशमीनिमित्त शुक्रवारी पूजेसाठी झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून महाड शहरासह परिसरात दीडशे क्विंटल झेंडू फुलांची आवक झाली आहे.

Half a quintile marigold arriving; The market rises in Mahad, rain reduction in production due to rain | दीडशे क्विंटल झेंडूची आवक; महाडमध्ये बाजारपेठेत गर्दी, पावसामुळे उत्पादनात घट

दीडशे क्विंटल झेंडूची आवक; महाडमध्ये बाजारपेठेत गर्दी, पावसामुळे उत्पादनात घट

Next

महाड : विजयादशमीनिमित्त शुक्रवारी पूजेसाठी झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून महाड शहरासह परिसरात दीडशे क्विंटल झेंडू फुलांची आवक झाली आहे. शहरातील शिवाजी चौक तसेच मुख्य रस्त्यांवर झेंडू फुलांची दुकाने थाटण्यात आली आहेत, मात्र यंदा फुलांचे भाव वधारले आहेत.गेल्या वर्षी साठ रु पये प्रति किलो दराने विक्री केलेल्या फुलांची विक्र ी यंदा मात्र प्रति किलो शंभर रुपये दराने केली जात आहे.
कलकाता, सँडो या जातीच्या फुलांचे उत्पादन पुणे, सातारा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाले होते. मात्र नुकताच या परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने या उत्पादनात घट झाली. परिणामी फुलांचा दर जागेवरच महाग पडला, त्यामुळे नाइलाजाने झेंडू फुलांचा दर गतवर्षीच्या तुलनेत वधारला असल्याची माहिती फूलविक्रे ते मुन्ना लाले व रमेश महाडिक यांनी दिली. शुक्रवारी सकाळपासून या फुलांची खरेदी करण्यासाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. महाडजवळ महामार्गावर तसेच औद्योगिक क्षेत्रात रस्त्यालगत अनेक ठिकाणी या फुलांची विक्र ीची दुकाने सर्वत्र थाटण्यात आलेली होती. काही ठिकाणी तर सातारा, सासवड येथील फूल उत्पादक शेतकरी स्वत: फुलांची विक्र ी करताना दिसून आले. घरात पूजेसाठी व दुकानात तोरणे बांधण्यासाठी या झेंडूंच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, तर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये देखील या फुलांचा सजावटीसाठी वापर केला जातो.

Web Title: Half a quintile marigold arriving; The market rises in Mahad, rain reduction in production due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा