उरण : तालुक्यात वाहतुकीची समस्या बिकट झाली असून वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण यामुळे बकाल वस्त्यांची निर्मिती होत आहे. अनधिकृत बांधकामांचा फटका शहर व तालुक्याच्या विकासाला बसला आहे. त्यामुळे सिडकोने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा विडा उचलला आहे. उरण येथील चारफाटा येथे सिडकोच्या मालकी हक्काच्या जागेवर बांधलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.चारफाट्यावर प्रवाशांना ये-जा करण्यासाठी नेहमी अडचण होत होती, शिवाय सिडकोला न कळविता किंवा कोणतीही परवानगी न घेता येथे घरे व व्यावसायिक गाळे (दुकाने) बांधण्यात आली. सिडकोच्या मालकी हक्काच्या चारफाटा येथे जागेचा नागरिकांकडून गैरवापर सुरू होता. त्यामुळे नवी मुंबई सिडकोच्या अतिक्रमण विभागाने चारफाट्यावरील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या वेळी सिडकोचे सुरक्षा रक्षक, पोलीस प्रशासन, विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. कडक बंदोबस्तात संबंधित कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)
अनधिकृत बांधकामांवर हातोडा
By admin | Published: December 24, 2016 3:18 AM