महामार्गावर धुळीने प्रवासी हैराण; मुंबई-गोवा महामार्ग व पेण-खोपोली महामार्गाचे रुंदीकरणाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:10 AM2020-02-04T00:10:25+5:302020-02-04T00:13:31+5:30

उपाययोजना करण्याची मागणी

Harassing passenger on the highway; Work of widening of Mumbai-Goa highway and Pen-Khopoli highway | महामार्गावर धुळीने प्रवासी हैराण; मुंबई-गोवा महामार्ग व पेण-खोपोली महामार्गाचे रुंदीकरणाचे काम

महामार्गावर धुळीने प्रवासी हैराण; मुंबई-गोवा महामार्ग व पेण-खोपोली महामार्गाचे रुंदीकरणाचे काम

Next

पेण : शहरालगत पेण रेल्वे स्थानक ते रामवाडी परिसरात महामार्ग रुंदीकरण कामासाठी मातीच्या भरावाचे काम वेगाने सुरू आहे. या मातीचा धुरळा या मार्गावरील प्रवासी वाहने, अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे अधिक तीव्रतेने उडत आहे. सध्या वाहणारे जोरदार वारे व वाहनांच्या वेगामुळे धुळीचे लोट उडत आहेत. यामुळे पाठीमागच्या प्रवासी वाहनांमधील प्रवासी, वाहनचालकांच्या नाका, तोंडात धुळ जात असल्याने आजाराला निमंत्रण मिळत आहे. सकाळ व संध्याकाळी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, प्रवाशी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे येथून प्रवास करणाºया नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

उडणाऱ्या धुळीने त्रस्त अनेकांना श्वसनाचे आजार, दमा, खोकला, सर्दी या विकारांनी ग्रासले आहे. गेल्या महिनाभरात या समस्येला तोंड देता-देता प्रवाशांना नाकी नऊ आले आहे. महामार्गाचे काम करणाºया ठेकेदार कंपनीला पाणी मारण्यासाठी वेळ नाही. मात्र, ठेकेदार कंपनीच्या या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिक व प्रवाशांना नाहक सहन करावा लागत आहे.

झाडे तोडल्याने रस्ता उजाड

मुंबई- गोवा महामार्ग रुंदीकरणाच्या कामाबरोबरच पेण- खोपोली रुंदीकरणाच्या कामासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला मातीच्या भरावाचे सपाटीकरण सुरू आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडून रस्ता उजाड केला आहे.माती भरावामुळे या परिसरात दिवसभर उडणाºया धुळीमुळे प्रवासी, वाहनचालक, स्थानिक नागरिक त्रासले आहेत. या धुळीचे लोट वाऱ्यांबरोबर या परिसरातील पिके, फळझाडे व महामार्गानजीक असलेल्या लोकवस्तीमध्ये उडत असल्याने या सर्वांना या समस्येला तोंड द्यावे लागते आहे. आजारी रुग्णांना याचा अधिक त्रास होतो.

उडणाºया धुळीने त्रस्त अनेकांना श्वसनाचे आजार, दमा, खोकला, सर्दी या विकारांनी ग्रासले आहे. गेल्या महिनाभरात या समस्येला तोंड देता-देता प्रवाशांना नाकी नऊ आले आहे. महामार्गाचे काम करणाºया ठेकेदार कंपनीला पाणी मारण्यासाठी वेळ नाही.

माती भरावाचे काम सुरू

1. मुंबई-गोवा, पेण-खोपोली या दोन्ही महामार्ग रुंदीकरणाचे माती भरावाचे काम करणारी एकच ठेकेदार कंपनी आहे. मातीचे डम्पर, रस्त्यावरची माती, वाहणारे वेगवान वारे यामुळे सर्वत्र उडणारी धूळ प्रवाशांसह स्थानिक जनतेला यांचा होणारा त्रास याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचाºयांनी लक्ष देऊन, या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक असतानासुद्धा ती के ली जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

2. त्यामुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहेत, त्या तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी या समस्येला पायबंद घालण्यासाठी केली आहे.

3. जोपर्यंत प्रवासी व स्थानिक शांत आहेत, तोपर्यंत ठीक आहे. मात्र, याचा अतिरेक झाल्यास परिस्थिती गंभीर होऊन याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार राहतील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

Web Title: Harassing passenger on the highway; Work of widening of Mumbai-Goa highway and Pen-Khopoli highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.