पनवेलमधून शेकापच्या वतीने हरेश केणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:30 AM2019-09-30T02:30:03+5:302019-09-30T02:30:26+5:30
पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापने नगरसेवक हरेश केणी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शेकापने उरणपाठोपाठ आता पनवेल मतदारसंघाची उमेदवारीही जाहीर करून कार्यकर्त्यांतील संभ्रम दूर केला आहे.
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापने नगरसेवक हरेश केणी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शेकापने उरणपाठोपाठ आता पनवेल मतदारसंघाची उमेदवारीही जाहीर करून कार्यकर्त्यांतील संभ्रम दूर केला आहे.
कार्यकर्त्यांना पक्षाच्या चिन्हाचा प्रचार करण्याचे आदेश पक्षाच्या नेत्यांनी दिले होते. ऐन वेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने पक्षनेतृत्व सक्षम उमेदवाराच्या शोधात होते. पनवेल विधानसभेसाठी पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, कळंबोलीमधील शेकापचे नगरसेवक रवींद्र भगत यांचे नाव चर्चेत होते. अखेर रविवारी हरेश केणी यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली. हरेश केणी यांचा ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क आहे. केणी यांच्या घरातून दोन नगरसेवक पनवेल महानगरपालिकेत निवडून आले आहेत. केणी हे पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र मांक ३ मधील निवडून आले आहेत. तर प्रभाग क्र मांक १ मधून त्यांचे बंधू दिनेश केणी यांच्या पत्नी निवडून आलेल्या आहेत.