फ्रान्समधील स्पर्धेत हरिहरेश्वरच्या जाई लांगीची उत्कृष्ट कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:23 AM2018-08-14T03:23:56+5:302018-08-14T03:24:18+5:30
फ्रान्समध्ये संपन्न झालेल्या ३१ व्या आंतरराष्ट्रीय बालनृत्य महोत्सवात भारतासह फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, बल्गेरिया, सर्बियासारख्या बलाढ्य देशांनी भाग घेतला होता.
म्हसळा : फ्रान्समध्ये संपन्न झालेल्या ३१ व्या आंतरराष्ट्रीय बालनृत्य महोत्सवात भारतासह फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, बल्गेरिया, सर्बियासारख्या बलाढ्य देशांनी भाग घेतला होता.
भारतातून मुंबई येथील नटराज अॅकॅडमी आॅफ परफॉर्मिंग, बोरीवली या संस्थेने महोत्सवात सहभाग घेऊन भारतातर्फे उत्तम कामगिरी बजावली. या २४ सदस्यांच्या पथकात १३ बाल कलाकारांनी सहभाग घेतला. यात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील जाई लांगी ही सहभागी ोती.
भारतीय नृत्य पथकातील महाराष्ट्रातील कलाकारांनी गण, गौळण, लावणी, आसाममधील कलाकारांनी बिहू, ओडिसामधील दालखात्री, उत्तरप्रदेशमधून चारकुला, राजस्थानमधून तेराताली, हिमाचलमधून पंगी, तामिळनाडूमधून करघट्म अशा प्रकारच्या कला सादर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून आणले.