शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मुरुड नगरपरिषदेचा गटारावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा

By admin | Published: May 25, 2017 12:17 AM

मुरुड शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी गटारावर लाद्या टाकून, या जागेचा वापर केल्याने पावसात गटाराचे पाणी तुंबत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरुड : मुरुड शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी गटारावर लाद्या टाकून, या जागेचा वापर केल्याने पावसात गटाराचे पाणी तुंबत होते. यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. यामुळे मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी गटारावरील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कार्यवाहीस सुरु वात केली आहे. पहिल्या सत्रात त्यांनी मासळी मार्केट भागात झालेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवून ही बांधकामे जमीनदोस्त केली.काही दिवसांपूर्वी मुरु ड बाजारपेठ भागाकडे लक्ष देत तेथील सर्व व्यापाऱ्यांना नगरपरिषदेच्या वतीने नोटीस पाठवून गटारावरील बांधकाम तोडण्यास सांगितले. यानंतर यातील काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून पुढे येऊन गटारावरील लाद्या व कडापे काढून स्वत:हून सहकार्य केले, तर काही कामे ही नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी केली आहेत. बाजारपेठ भागात काही ठिकाणी गटारावरील बांधकाम दूर केल्यावर तेथील लाद्यांचे तुकडे व मातीचे ढीग तसेच ठेवल्याने वाहतुकीस मात्र मोठी समस्या उद्भवली आहे.ठिकठिकाणी मातीचे ढेर दिसून येत आहेत, हा कचरा अद्यापपर्यंत उचलला गेलेला नाही. काही काळातच आणखीन काही ठिकाणी गटारावरील बांधकामे तोडण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे आत्ता या पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.