पाली शहरावर हवा सीसीटीव्हीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:12 PM2019-12-19T23:12:09+5:302019-12-19T23:12:51+5:30

चोरीच्या घटनांत वाढ : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, प्रशासन अपुरे

have CCTV Watch on Pali City | पाली शहरावर हवा सीसीटीव्हीचा वॉच

पाली शहरावर हवा सीसीटीव्हीचा वॉच

Next

विनोद भोईर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : अष्टविनायकापैकी एक तीर्थ क्षेत्र असलेल्या पालीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. नागरीकरण वाढल्याने नवनवीन व्यवसाय विकसित होत आहेत. तसेच चोº्या आणि घरफोडयांचे प्रमाणही वाढले आहे. अशा वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पालीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलीस व महसूल प्रशासनाकडून याबाबत दुजोरा दिला जात आहे.


पाली शहराची लोकसंख्या जवळपास पंधरा हजार आहे. सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असल्याने सरकारी व खाजगी कार्यालये आणि मोठी बाजारपेठ पालीत आहे. अनेक लोक येथे स्थायिक झाले आहेत. अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्याने रोज असंख्य भाविक पालीत दाखल होत असतात. त्यामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहेत. २७ नोव्हेंबरला पालीतील एक ज्वेलर्सच्या दुकानात चोरीचा प्रयत्न झाला मात्र सायरन असलेल्या कुलूपामुळे तो फसला. दोन तीन महिन्यापूर्वीही घरफोड्या झाल्या आहेत.

पालीत घरफोड्यांचे प्रमाण दिवसन्दिवस वाढत आहे. या सर्व चोरांचा ठावठिकाणा काही कुठे लागत नाही. एक दोन वर्षांपूर्वी पालीतील बल्लाळेश्वर देवळाबाहेरील दुकानातील एका महिलेचे गंथन चोराने चोरून नेले होते. अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्या रोखण्यासाठी याबरोबरच वाहतुकीचे नियम तोडणारी वाहने, अपघात, छेडछाडीचे प्रकार यांवर नजर ठेवण्यासाठी पालीत नाक्यांनाक्यावर व महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. पालीत काही ज्वेलर्स व इतर दुकानाबाहेर तसेच बल्लाळेश्वर मंदिराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र ते फक्त ठराविक मर्यार्देत आहेत. परिणामी पाली गावात प्रवेश होतो त्या ठिकाणी म्हणजे पंचायत समिती कार्यालय, मिनिडोअर स्टॅन्ड याबरोबरच बल्लाळेश्वर मंदिर, सर्व नाके, शाळा व महाविद्यालय या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. मात्र सीसीटीव्ही बसविणे व त्यासाठी आवश्यक आर्थिक बाबींची तरतूद पोलीस किंवा महसूल प्रशासनाकडे नाही. त्यामुळे पाली ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी माणगी नागरिकांसह याठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत व काही कंपन्यांनी पालीत सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न व मदत करावेत. तसेच व्यावसायिक, ज्वेलर्सनेही दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवून घ्यावेत.
- दिलीप रायन्नावार,
तहसीलदार, पाली-सुधागड

सीसीटीव्ही बसविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वेगळा फंड किंवा निधी नाही. तरी देखील सामाजिक संस्था व कंपनी सीएसआरच्या माध्यमातून निधी मिळवून सीसीटीव्ही बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- गणेश बाळके, सरपंच, पाली

पालीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आवश्यक आहे. मात्र यासाठी आमच्याकडे कोणतीही आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घ्यावा.
- बाळा कुंभार,
पोलीस निरीक्षक,
पाली

Web Title: have CCTV Watch on Pali City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.