शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

घागरकोंड पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 3:59 AM

तालुका हा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध होत असताना या पर्यटन स्थळाकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाकण ग्रामपंचायत हद्दीतील

लोकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : तालुका हा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध होत असताना या पर्यटन स्थळाकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाकण ग्रामपंचायत हद्दीतील सावित्री नदीवरील घागरकोंड झुलता पूल हा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. हा झुलता पूल नायगरा धबधब्याची आठवण करून देणारा जलप्रपात पहाण्यासाठी हजारो पर्यटक या स्थळाला भेट देत असतात. सध्या हा झुलता पूल धोकादायक बनला असून बऱ्याच ठिकाणी वायररोप तुटला आहे. जॉइंटच्या ठिकाणी गंज लागून तुटण्याच्या अवस्थेत आहे. जर जास्त संख्येने पर्यटक या पुलावर गेले तर हा पूल तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी स्थिती असताना देखील येथे कोणतीही धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत.या ठिकाणी नदीच्या दोन्हीही बाजूला संरक्षक कठड्यांची आवश्यकता आहे. संरक्षक कठडे नसल्याने गेल्या वर्षी एका शाळकरी मुलाचा पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाला. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. याबाबत स्थानिक जिल्हा परिषद सदस्य तथा माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्याशी संपर्क साधला असता आपण गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेकडे येथे संरक्षक कठडे आणि वायररोप बदलण्याची मागणी करत आहोत. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत राजिप बांधकाम उपविभाग महाड कार्यालयाशी संपर्क साधला असता हा झुलता पूल अंदाजे ३५ वर्षांपूर्वी बांधला असल्याची माहिती दिली. १५ वर्षांपूर्वी या पुलाचे वायररोप बदलल्याचे सांगितले. तसेच संरक्षक कठडे आणि वायररोप बदलण्याचे अंदाजपत्रक दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठवल्याची माहिती उपअभियंता शिर्के यांनी दिली. संबंधित खात्याने या झुलत्या पुलाकडे तातडीने लक्ष देवून वायररोप, संरक्षक कठडे लवकर करून सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.