अपंग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिर
By admin | Published: December 24, 2016 03:17 AM2016-12-24T03:17:47+5:302016-12-24T03:17:47+5:30
पंचायत समिती खालापूर यांच्यावतीने धीरुभाई अंबानी हॉस्पिटल व लोधिवली ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने लोधिवली
मोहोपाडा : पंचायत समिती खालापूर यांच्यावतीने धीरुभाई अंबानी हॉस्पिटल व लोधिवली ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने लोधिवली येथील धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अपंग व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या तपासणी शिबिराचा तालुक्यातील पाचशेपेक्षा जास्त व्यक्तींनी लाभ घेतला. यावेळी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी फॉर्म भरल्यानंतर रुग्णांची शारीरिक तपासणी करण्यात आली.
यात अपंगत्व असणाऱ्या रुग्णांना अलिबाग कार्यालयामार्फत अपंगत्वाचे प्रमाणपत्र घरपोच मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यात ४९० रुग्ण आढळून आले. यामध्ये दृष्टिदोष रुग्ण ६९, गतिमंद ८२, कान, नाक, घसा रुग्ण ६०,अस्थिव्यंग /हाडांचे २६४ व इतर ६ अशा ४९० रुग्णांना अपंगत्व असल्याचे तपासणीतून दिसून आले. हा तपासणी कार्यक्र म सलग आठ तास सुरू होता. यावेळी रुग्णांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, सहा.गटविकास अधिकारी जगताप आदी उपस्थित होते. (वार्ताहर)